महाराष्ट्र 9

चोपड्यात धूमस्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबवीले# एका आठवळ्यात दुसरी घटना महिलांमध्ये भीतीचे वातावरण

[espro-slider id=13780]

चोपड्यात धूमस्टाईलने महिलेचे मंगळसूत्र लांबवीले# एका आठवळ्यात दुसरी घटना महिलांमध्ये भीतीचे वातावरण

चोपडा ;- पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील १ लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी ओढून दुचाकीवरून धूमस्टाईल लांबविण्याची घटना शहरातील यावल रोडवरील एम. जी. कॉलेज समोर घडली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुवर्ण राजेंद्र सैन्धाने (वय ५२) रा. महालक्ष्मी नगर, यावल रोड, चोपडा या महिला ११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्या यावल रोडने घरी पायी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या मागून अज्ञात दोन जण दुचाकीवर येऊन उभे राहिले, यातील एकाने महिलेच्या गळ्यातील ३३ ग्रॅम वजनाची सुमारे १ लाख ३२ हजार रुपये किमतीची सोन्याचे मंगळसूत्र जबरी हिस्कावून दुचाकीवरून पसार झाले. महिलेने आरडा ओरड केली तोपर्यंत दोघे दुचाकीने पसार झाले होते. दरम्यान महिलेने चोपडा शहर पोलीस ठाण्यातदिलेल्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुरुवार १३ जुलै रोजी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण या घटनेचा पुढील तपास करीत आहे. या पूर्वीशुक्रवार, दि.७ जुलै रोजी पावणेआठ वाजता घराकडे पायी येत असताना पाठीमागून विना नंबर प्लेट असलेली दुचाकीवरून धूम स्टाईलने आलेल्या २० ते २५ वयोगटातील चोरट्यांनी  रामकुंवर नगर, चोपडा येथील शिक्षिकेचा गळ्यातील १७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र घेऊन पसार झाले होते. एका आठवळ्यात ही दुसरी घटना घडल्याने शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.









Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]