महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील कारोना संशयीत रुग्णाचा मृत्यू ,जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळले,जळगाव@43

[espro-slider id=13780]

जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तीपैकी दोन व्यक्तीचे तपासणी अहवाल शनिवारी प्राप्त झाले आहे. या दोन्ही व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

या दोन्ही व्यक्ती भुसावळ च्या असून यात 42 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.

तसेच चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील 65 वर्षीय कोटोना संशयित महिलेचा शनिवार दि. 2 मे टोजी पहाटे मृत्यू झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैटे यांनी दिली.सदर महिलेचा स्वब घेण्यात आला असून रिपोर्ट येणे बाकी आहे. तसेच त्या महिलेचे मृत्यूचे कारण देखील अस्पष्ट आहे. सदर महिलेच्या रिपोर्ट काय येतो याकडे लक्ष लागून आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]