महाराष्ट्र 9

महिला सन्मान बचत योजनेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा… आ. लताताई सोनवणे…

[espro-slider id=13780]

महिला सन्मान बचत योजनेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
योजनेचा महिलांनी लाभ घ्यावा… आ. लताताई सोनवणे…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


भारतीय डाक विभागाने खास महिलांकरिता बचतीची आणि सर्वात जास्त व्याजदराची नवीन योजना सुरू केली असून फक्त दोन वर्ष कालावधीसाठी हि महिला सन्मान बचत योजना भारत सरकारने देशातील महिलांना गुंतवणुकीत सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या बळकट करण्यासाठी देशभरातील सर्वच डाकघरात महिला सन्मान बचत योजना हि नवीन योजना सुरू केली आहे.


सदर योजनेची सविस्तर माहिती चोपडा पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर मनोज पाटील व भूषण सैंदाने डाक निरीक्षक, यावल विभाग यांनी तालुक्याच्या आ. सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व मा. आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना महिला सन्मान बचत पत्र याविषयी सविस्तर माहिती दिली व त्यांनी तालुक्यातील सर्व महिलांना जास्तीत जास्त महिला बचत सन्मान खाती उघडावी याबद्दल आवाहन केले .


ज्यामध्ये केवळ महिलाच गुंतवणूक करू शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्रावर केवळ दोन वर्षात ७.५ टक्के व्याज दिले जाईल. महिला सन्मान बचत योजना ही एक वन टाइम गुंतवणूक करण्याची योजना आहे. या योजनेची वैशिष्ट्ये असे की, या योजनेमध्ये तुम्ही कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दोन लाख रुपये गुंतवणूक करू शकतात. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र यामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला ७.५% याप्रमाणे व्याज मिळेल. यामध्ये कोणत्याही वयोगटातील महिला गुंतवणूक करू शकतात .या योजनेच्या लाभ २ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२५ पर्यंत घेऊ शकता म्हणजे तुम्ही या कालावधीमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन वर्षानंतर मुद्दल व्याजासकट मिळेल. मुदतपूर्व खाते सहा महिन्यानंतरच बंद केले जाऊ शकते. एक वर्षानंतर ४० % रक्कम काढता येते.

भारत सरकारच्या तिमाही व्याजदरामध्ये जसे बदल होतील त्याप्रमाणे रक्कम मिळेल. सदर योजनेची अधिक माहिती मिळवण्याकरिता चोपडा टपाल कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहन चोपडा डाक घराचे पोस्टमास्तर मनोज पाटील यांनी तालुक्यातील महिलांना आवाहन केले आहे. सदर योजनेला तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत असून चोपडा तालुका भुसावळ डाक विभागात प्रथम क्रमांक राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]