अनेर धरणातून येत्या सोमवारी पाणी सोडण्यात येईल या कार्यकारी अभियंता यांच्या आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तूर्त स्थगित….एस बी पाटील

चोपडा(प्रतिनिधी):- अनेर धरणं मधून नदीत आवर्तन सोडणे बाबत जिल्हाधिकारी धुळे यांचे आदेश झाल्यानंतर त्यातील पैसे भरण्याच्या बाबतीतील अटी बाबत कोरोणा च्या पार्श्वभूमीवर हे संकट आटोपे पर्यंत थांबण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता दराडे साहेब यांनी एस बी पाटील यांना दिले व धरणातून सोमवारी पाणी सोडण्याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले व तसे आश्वासन तहसीलदार यांना देखील दिले.म्हणून पाच तारखे पर्यंत आंदोलन स्थगित केले असून जर पाणी सोडले नाही तर सहा तारखेला आंदोलन करण्यात येईल.
आंदोलन करू नये या संदर्भातील बैठक तहसील कार्यालयातील तहसीलदार अनिल गावीत यांच्या कार्यालयात झाली त्यावेळी ए पी आय अराक,पाटबंधारे अभियंता पी बी पाटील,एस बी पाटील,शशी देवरे हे हजर होते.