धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ तर्फे covid19साठी ₹ १०१००० चा धनादेश

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी बांधव हे आपल्या दैनंदिन जीवन जगत असतांना अनेक संकटाला सामोरे जात आहे. कारण सध्या कोरोना विषाणू मुळे सर्वत्र लॉकडाउन असल्याने या भागातील नागरिकांना त्याचा फटका बसत आहे अश्या परिस्थितीत आज दि ३० रोजी धनाजी नाना चौधरी आदिवासी सेवा मंडळ सत्रासेन तर्फे मुख्यमंत्री सहय्यता मदत निधीcovid19साठी ₹ १०१००० तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले यावेळी अध्यक्ष दादासाहेब श्री रविंद्र रायसिंग भादले ,नानासाहेब ज्ञानेश्वर रायसिंग भादले सचिव, धनजंय रायसिंग भादले उपाध्यक्ष, परमवीर रायसिंग भादले खजिनदार,नरेंद्र रायसिंग भादले जितेंद्र रायसिंग भादले, चैतन्य ज्ञानेश्वर भादले व संचालक मंडळ उपस्थित होते