महाराष्ट्र 9

चोपडा रुग्णालय, शासकीय पीपीई किट सुपूर्द* निरामय सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, जी.एम.फाऊंडेशनचा मदतीचा हात*

[espro-slider id=13780]

चोपडा रुग्णालय, शासकीय पीपीई किट सुपूर्द

निरामय सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, जी.एम.फाऊंडेशनचा मदतीचा हात

चोपडा – येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निरामय सेवा संस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, जी.एम.फाऊंडेशनकडून पीपीई किट रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॅा.मनोज पाटील यांना जिल्हा रा.स्व.संघचालक राजेश पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केले.यावेळी सामाजिक अंतर देखील राखण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० पीपीई किट्स देण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख, कवी कासार हे साहित्य घेवून आले होते.
यावेळी तालुका संघचालक डॅा.मनोज साळुंखे,माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके, भाजपचे जिल्हा चिटणीस राकेश पाटील, जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जायसवाल, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक,रा.स्व.संघाचे मनोज विसावे,संदीप पाटील,गौरव अग्रवाल, किसान संघाचे श्रीकांत नेवे,भाजपचे मनोहर बडगुजर,राम पाटील,वैद्यकिय अधिकारी डॅा.पंकज पाटील, शेतकी संघाचे माजी प्रेसिडेंट हिंमतसिंग पाटील,राजेश खैरनार,सुरेश चौधरी,किशोर पाटील आदी हजर होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]