महाराष्ट्र 9

एच एस सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश..

[espro-slider id=13780]

एच एस सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराचे घवघवीत यश

चोपडा (प्रतिनिधी) : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिराने आपल्या दैदिप्यमान यशाची परंपरा कॉपीमुक्त अभियान राबवितही यंदाही कायम राखली आहे.एच एस सी परीक्षेत प्रताप विद्या मंदिराच्या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त करत शाळेची यशोपताका फडकावत ठेवली आहे.


यावेळी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून पाटील तेजस डिगंबर याने ७९.१७ % गुण प्राप्त करत विज्ञान शाखेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९३.०२ % लागला असून महाजन तन्वी सुधीर या विद्यार्थिनीने ८५.८३% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कला शाखेचा निकाल ८८.८८ टक्के लागला असून पाटील खुशबू गणेश या विद्यार्थिनीने ८२.५० टक्के गुण प्राप्त करत कला शाखेत प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला आहे. तसेच व्यवसाय शिक्षण शाखेचा निकाल ९६.९७ टक्के लागला असून शाखेतील इलेक्ट्रिकल शाखेचा निकाल ९२.३० टक्के, ऑटोमोबाईल शाखेचा निकाल १०० टक्के आणि फूड प्रॉडक्शन शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.

व्यवसाय शिक्षण विभागात पाटील प्रशांत अनिल या विद्यार्थ्याने ६४.५० टक्के गुण मिळवत शाखेतून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष शैलाबेन मयूर,चेअरमन राजाभाई मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, सचिव माधुरीताई मयूर, संचालक उर्मिलाबेन गुजराथी,चंद्रहासभाई गुजराथी, भूपेंद्रभाई गुजराथी, रमेशभाई जैन, तसेच मुख्याध्यापक पी एस गुजराथी, उपमुख्याध्यापक एस जी डोंगरे, उपप्राचार्य जे एस शेलार, समन्वयक गोविंदभाई गुजराथी,पर्यवेक्षक एस एस पाटील, पी डी पाटील, श्रीमती एम डब्ल्यू पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधूं भगिनींनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]