महाराष्ट्र 9

सभापती उपसभापती निवडणूक झाली बिनविरोध.. #चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी नरेंद्र वसंत राव पाटील
उपसभापती पदी विनायकराव चव्हाण..

[espro-slider id=13780]

सभापती उपसभापती निवडणूक झाली बिनविरोध.. #चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी नरेंद्र वसंत राव पाटील उपसभापती पदी विनायकराव चव्हाण…

दोन्ही गटातील संचालकांच्या समझोत्या नंतर शिंदे शिवसेना गटाकडे सभापती पद तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गटाकडे उपसभापती पद..#सुरुवातीचे दीड वर्ष नंतर चे दोन वर्षे आणि पुन्हा शेवटचे दीड वर्ष असा झाला खाजगी करार ..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा.

चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिंदे शिवसेना आणि भाजप गटाचे नरेंद्र पाटील (गरताड) यांची सभापती पदी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे विनायकराव चव्हाण (वर्डी) यांची उपसभापती बिनविरोध निवड करण्यात आली. दोन्ही गटांकडे नऊ नऊ संचालक असल्याने गेल्या पंधरा दिवसापासून ईश्वर चिट्ठी चा पर्याय वापरला जाईल असे भाकीत होत होते. परंतु ईश्वरचिठ्ठीने सभापती आणि उपसभापती जे ठरतील त्यांना संपूर्ण पाच वर्षे कालावधी मिळाला असता. इतर संचालकांना संधी मिळाली नसती म्हणून इतर संचालकांनाही संधी मिळावी यासाठी सभापती व उपसभापती दोन्ही पदे बिनविरोध झाले.

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणानंतर नऊ संचालक आणि शिंदे शिवसेना व भाजप यांच्या गटाचेही नऊ संचालक निवडून आले आहेत. दोघींकडे नऊ संचालक असल्याने व कोणत्याही गटाचा संचालक फुटण्यास तयार नव्हता अशा परिस्थितीत सर्व 18 संचालक एकत्र येऊन त्यांनी आपसात समझोता केला.

आणि सुरुवातीचे दीड वर्ष शिंदे शिवसेना आणि भाजप गटाचा सभापती तर त्याच वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी गटाचा उपसभापती, नंतरच्या दोन वर्षासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी गटाचा सभापती तर त्याच वेळेस शिंदे शिवसेना आणि भाजप गटाचा उपसभापती आणि उर्वरित शेवटच्या दीड वर्षात पुन्हा शिंदे शिवसेना व भाजपच्या गटाचा सभापती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाचा उपसभापती असा खाजगी करार झाल्याने सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक  एस. एफ. गायकवाड यांनी तर त्यांना मदत म्हणून सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संजय पाटील, रोहिदास सोनवणे यांनी काम पाहिले.


     सर्वप्रथम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरच्या मजल्यावर असलेल्या सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासनाधिकारी एस. एफ. गायकवाड यांच्याकडे सभापती व उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले.


समझोता करण्यास हरकत नाही असा विषय  नंदकिशोर सांगोरे आणि शिवराज पाटील या संचालकांनी केला. त्यास इतर संचालकांनी ही मान्यता दिली आणि केवळ दहा मिनिटात समझोता होत  दीड वर्ष – दोन वर्ष – आणि पुन्हा दिड वर्ष असा खाजगी करार झाला व त्यानुसार प्रथम शिंदे शिवसेना गटाकडे सभापती पद देण्याचे ठरले व उपसभापती पद हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडे देण्याचे ठरले. झालेल्या खाजगी करारानुसार सर्व संचालकांनी टिकून राहावे यासाठी शपथही घेतलेली आहे. दोन्ही गटाचे 18 संचालक एकत्र आले आणि झालेला करार दोन्ही गटाकडील संचालकांनी त्यांच्या नेत्यांना त्यात विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील, साखर कारखान्याचे माजी चेअरमन व जिल्हा बँकेचे माजी संचालक डॉ. सुरेश शामराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे भाजप गटाचे जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांना संबंधितांनी भ्रमणध्वनीवरून कळविले व मांडलेल्या प्रस्तावास सर्व नेत्यांनीही सहमती दर्शवली आणि अवघ्या पाच मिनिटात सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी हे संचालक होते उपस्थित होते.
ॲड. घनश्याम निंबाजी पाटील, नंदकिशोर भानुदास पाटील, विजय शालिग्राम पाटील, डॉ. अनिल रामदास पाटील, मिलिंद गणपतराव पाटील, सोनाली नारायण पाटील, कल्पना भरत पाटील, मनोज अशोकराव सनेर, नंदकिशोर सांगोरे, वसंत पिरन पाटील, गोपाल श्रीराम पाटील, शिवराज संभाजी पाटील, किरण रामलाल देवराज, सुनील मगनलाल देवराज, सुनील तिलोकचंद जैन, नितीन शालिग्राम पाटील हे संचालक उपस्थित होते.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]