महाराष्ट्र 9

जळगाव जिल्ह्यातील दोन पोलिसाना मालेगावात कोरोनाची लागण *एक कानळदा येथील रहिवाशी तर दुसरा भडगाव तालुक्यातील रहिवाशी.*

[espro-slider id=13780]

जळगाव जिल्ह्यातील दोन पोलिसाना मालेगावात कोरोनाची लागण

एक कानळदा येथील रहिवाशी तर दुसरा भडगाव तालुक्यातील रहिवाशी

जळगाव : जळगाव पोलीस दलातून 110 कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले आहेत. त्यातील चार कर्मचार्‍यांचे चार दिवसापूर्वीच स्वॅब घेण्यात आले होते, त्याचा अहवाल बुधवारी रात्री प्राप्त असून चौघांपैकी एक जळगाव तालुक्यातील कानळदा येथील रहिवासी पोलीस कर्मचार्‍यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तर दुसरा जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील मूळ रहिवासी व मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील दोघो पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

संपर्कातील कर्मचार्‍याने घेतले स्वॅब
मालेगावात कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याने मृतांचाही आकडा मोठा आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने नाशिक परिक्षेत्रातून मालेगावात पोलिसांचा बंदोबस्त मागविण्यात आला आहे. जळगाव पोलीस दलातून 110 कर्मचारी बंदोबस्तासाठी गेले आहेत. यात संबंधित कर्मचार्‍याचाही समावेश आहे. कानळदा येथील रहिवासी पोलीस कर्मचारी हा यावल पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आला आहे. बुधवारी रात्री या कर्मचार्‍याला सरकारी कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कात असलेल्या सर्व कर्मचार्‍यांचेही स्वॅब घेण्यात आलेले आहेत. या कर्मचार्‍याने पारोळा तालुक्यील हनुमंतखेडा येथे मुक्कमा केल्याची माहिती समोर आली असून त्यानुसार हनुमंतखेडा सील करण्यात आले आहे.
*पोलिसाच्या सासरच्यां मंडळींनां जळगावला हलविले*
भडगाव तालुक्यातील नालबंदी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी हा मालेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. यादरम्यानच्या काळात तो पारोळा तालुक्यातील जोगलखेडा येथील त्याच्या सासरवाडीला गेला होता. यादरम्यानच्या त्याच्या संपर्कातील 20 नातेवाईकांना जळगावला हलविण्यात आले आहे तर व या नातेवाईकांच्या संपर्कातील 34 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]