शिरपुर चोपडा जिल्हा सिमेवर पोलिसांची नाकाबंदी
वाहनांची कसून चौकशी

चोपडा (प्रतिनिधी ) जळगाव व धुळे जिल्ह्यातील राज्यातील शेवटचा शिरपुर व चोपडा तालुका मध्ये प्रदेशचा सिमेवर असुन कोरोनाला वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन व शासनाने कठोर पाऊले उचलून लाँकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे या कारवाईमुळे लाँकडाऊनचे नियम पाळले जात असल्याचे दिसुन येत आहे तसेच काही नागरिक धुळे जिल्ह्यात जाण्यासाठी ये जा करणाऱ्या नागरिकांना गंलगी येथे चोपडा शिरपुर या दोघेही तालुक्याचा सिमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे याठिकाणी ये जा करणाऱ्या नागरिकांना जाण्याचे कारण विचारले जात असुन पास आणली आहे का पास नाही तर घराच्या बाहेर कसे निघाले लाँकडाऊन का आणि कशासाठी आहे हे समजत नाही का असे विविध प्रश्नाचे भडीमार करून नागरिकांना नाकाबंदीवरुन वापस पाठवून दिले जात आहे तसेच अत्यावश्यक सेवा करणाऱ्या वाहनांना थांबवून त्या वाहनांची कसुन चौकशी करूनच सोडण्यात येत आहे
या जिल्ह्यातुन त्या जिल्ह्यात जाणारे नागरिकांना नाकाबंदीवर सेवा बजावणारे पोलिस बांधव व महसुलचे तलाटी बांधव भर उन्हाळ्यात स्वतःची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहुन चोख ड्युडी बजावली जात आहे तसेच कोरोना संर्दभात नागरिकांना घरातच थांबण्यासाठी मार्गदर्शन करीत असल्याचे दिसुन आले या नाकाबंदीवर सपोनी गुंजाळ यांच्या मार्गदर्शनखाली पो.ना.दिपक पाटील,पो काँ.रविंद्र पावरा,पोहेकाँ युसूफ शेख,होमगार्ड रणसिंग बंजारा,महसुलचे तलाटी डी.जे.बोरसे,होळनांथा,संदिप महाजन वाटोळा तलाटी आदि कर्मचारी सेवा बजावत आहेत