महाराष्ट्र 9

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवार पॅनलच्या जोरावर निवडणार की स्वबळावर ?# मतदारांना धनलाभ होणार?

[espro-slider id=13780]

चोपडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवार पॅनलच्या जोरावर निवडणार की स्वबळावर ?# मतदारांना धनलाभ होणार?

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा तालुक्यातील राजकारण सध्या पक्षातील अंतर्गत गट बाजी मुळे चर्चेत आहे त्यामुळे पक्षातील कार्यकर्ते सुध्दा संभ्रमित आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे बाजार समितीचा निवडणुकीत तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे .शिवसेनेचा शिंदे गट स्वतंत्र होता तसेच त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला होता. परंतु जेष्ठनेते अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व माजी तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके, जेष्ठनेते चांद्रशेखर पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचा एक गट यांच्यात युती होऊन पॅनल जाहीर झाले तसेच राष्ट्रवादीच्या नाराज गटाचे ॲड. घनश्याम पाटील, जिल्हा परिषदेचे बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल ,चोसाकाचे माजी चेअरमन डॉ. सुरेश पाटील, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील यांचे आघाडीचे दुसरे पॅनल निवडणुकीत उतरले असून, त्यांनी मूळ राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे.

निवडणुकीत शिंदे गटाच्या आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा स्वतंत्र गट होता. तसेच त्यांच्या पॅनलच्या उमेदवारांचा प्रचार देखील सुरू झाला होता. जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांची भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादीचे घनश्याम पाटील यांच्या गटाशी युती बाबत चर्चा सुरू होती मात्र जागांची तडजोड न झाल्याने अखेर त्यांनी ऐनवेळी शिंदे गटाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या गटाशी तडजोड करून शिंदे गट व भाजपा युतीच्या पॅनल मध्ये भाजपाचे काही उमेदवार दिलेत.

त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत प्रा. अरुणभाई गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी व भाजपाचे एक पॅनल, ॲड घनश्याम पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल यांचा राष्ट्रवादीचा नाराज गट, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष ऍड संदीप पाटील, डॉ. सुरेश पाटील यांचे नेतृत्वात आघाडीचे एक पॅनल तर आमदार लताताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचा शिंदे गट आणि जिल्हा दूध संघाचे संचालक रोहित निकम यांच्या नेतृत्वात भाजपचा दुसरा गट असे सेना, भाजपा युतीचे पॅनल अशी चुरसपूर्ण तिरंगी लढत होत आहे. तर काही अपक्ष उमेदवार देखील निवडणुकीत आपले भविष्य अजमावित आहेत .अश्या परिस्थितीत कार्यकर्तेच संभ्रमित झाले आहेत नेमकी राष्ट्रवादी ही भाईंची की पाटील यांची तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.उमेदवार हे पॅनल चा जोरावर निवडून येतील की स्वबळावर ? तालुक्यात चर्चा सुरू आहे .त्यातच एस बी नाना पाटील यांना झालेल्या कथित मारहाणचे शेतकरी किती विचार पूर्वक मतदान करतील हे तर निकालाचा दिवशी समजेल मात्र मतदार राजाला धन लाभ होणार असल्याची चर्चा तालुक्यात जोरदार सुरू आहे…


चोपडा प्रतिनिधी:-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]