महाराष्ट्र 9

गावठी कट्यासह मध्यप्रदेशातील युवकास अटक अडावद पोलिसांची कारवाही

[espro-slider id=13780]

गावठी कट्यासह मध्यप्रदेशातील युवकास अटक अडावद पोलिसांची कारवाही ..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी



चोपडा तालुक्यातील अडावद येथील उनपदेव फाट्यावर दि.१९ रोजी संध्याकाळी ७:३०वाजता आझादसिंग सुदानसिंग भाटीया वय २८ रा.उमटी ता.वरला जिल्हा. बडवाणी राज्य मध्य प्रदेश हा स्वताचे फायदयासाठी एक गावठी बनावटीचा कटटा त्याचे सोबत ०५ जिवंत काडतुस बाळगुन स्वताचे फायदयासाठी विक्री करण्याचे उददेशाने चोरटी वाहतुक करतांना मिळुन आला त्याचा कडून ५०,०००/- रुपये किमतीची एक काळया रंगाची बजाज पल्सर गाडी,१०००/- रुपये किमतीचे ०५ जिवंत काडतूस पिवळ्या धातूने बनवलेले,५०००/- रुपये किमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, ५०००/- रुपये किमतीचा एक रेडमी कंपनीचा मोबाईल असे एकूण ६१हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे अडावद पोलिस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांचा आदेशान्वये कैलास बावीस्कर करीत आहे

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]