अनेर धरणातून पाणी चे आवर्तन न सोडल्याने धरणात जल समाधी आंदोलन….

चोपडा (प्रतिनिधी):- अनेर धरणातील पाणी त्या नदीच्या काठावरील गावांच्या पिण्यासाठी राखीव आहे.गेल्या तीन चार वर्षांपासून पाणी सोडण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही.यावर्षी प्रत्येक गावच्या विंधन विहीरी खोल जात आहेत,त्यासाठी नवीन विहिरी करायला मशीन उपलब्ध नाहीत व पाईप खोल सोडल्यास पंप काम करीत नाहीत व हा सारा वर्ग शेतकरी आहे व तो चारही बाजूने बेजार असून अनंत अडचणी ना सामोरे जात आहे. कोरोणा च्या काळात प्रशासनास गेल्या २६मार्च पासून पाणी सोडण्याची विनंती करून जिल्हा परिषद जळगाव ने पैसे न भरल्यास पाणी सोडता येणार नाही असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सध्या लॉक डाऊन च्या काळात सर्व प्रकारच्या खाजगी वसुली/भाडे/बँकांची वसुली देखील तीन महिन्यापर्यंत सरकारने थांबवली आहेत,परंतु धुळे जिल्हा प्रशासनाने 2003 च्या सरकारी पत्राचा आधार घेऊन त्यांचे विभागाचे मागील पाणी बिलाची थकबाकी व चालू ५०%बिल न भरल्यास पाणी सोडता येणार नाही असा निर्णय घेतला.कदाचित इंग्रजांच्या काळात देखील असे निर्दयी प्रशासन नसावे असा हा आजचा निर्णय आहे.आज राज्यात सरकारी कर्मचारी 5%देखील कामावर नाही व सगळे आर्थिक व्यवहार बंद असे असताना ,असा निर्णय घेणे म्हणजे शेतकरी व ग्रामीण जनता होरपळून मरावी अशी इच्छा धुळे जिल्हा प्रशासनाची दिसत आहे.
जगात माणुसकी म्हणून लोक अन्नदान करीत आहेत परंतु धरणात पाणी असताना व ते पाणी उन्हाने वाफ होताना आज वाया जात आहे व उरलेले पावसाळ्यात वाया जाईल,त्याचा काय उपयोग?परंतु निव्वळ जनतेला छळणेसाठी पाणी न सोडण्याचा प्रशासनाचा हट्ट हा न समजण्यापलीकडे आहे,ते त्यांच्यातील माणुसकी शून्य पणाचे दर्शन घडवीत आहे.
आमचा आता संयम सुटला असून येत्या १मे रोजी आम्ही अणेर धरणात जल समाधी आंदोलन करणार असून जो पर्यंत पाणी सोडण्यात येणार नाही तो पर्यंत आम्ही पाण्यातून बाहेर येणार नाहीत.असा आशयाचे निवेदन तहसीलदार अनिल गावित यांना शेतकरी कृती समिती,चोपडा चे समन्वयक एस.बी पाटील यांनी दिला