महाराष्ट्र 9

ह. भ. प. बाळू महाराज गिरगांवकर भाट समाज बद्दल केलेल्या वक्तव्या बद्दल जाहीर निषेध. भाट समाजाचा वतीने चोपडा शहर पोलिसांना निवेदन …

[espro-slider id=13780]

ह. भ. प. बाळू महाराज गिरगांवकर भाट समाज बद्दल केलेल्या वक्तव्या बद्दल जाहीर निषेध. भाट समाजाचा वतीने चोपडा शहर पोलिसांना निवेदन …


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी



संत दत्तुजी महाराज पुण्यतिथी महोत्सव सोहळा या सप्ताहामध्ये दि. २१ मार्च २०२३ रोजी ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर याचे जाहिर किर्तन बरफगांव येथे आयोजीत केले होते. सदर आयोजना मागे आयोजन समितीचा शुध्द हेतु असावा तथापी ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांनी त्यांच्या किर्तना दरम्यान आयोजन समितीच्या व्यासपिठावरून उपस्थित जनसमुदायासमोर व प्रसार माध्यमांसमोर (माझी माऊली युटयुब चॅनल वर भाट समाजाविषयी आक्षेपार्ह जाहीर विधाने केली.भाट म्हणजे राजदरबारी बुट चाटणारे लोक भाटांना अक्कल नसते, भाट काही कामाचे नसतात,भाट फक्त लाऊडस्पिकरवे काम करतात,भाट पिराला बोकड कापल्यावर लिंबु कांदा घेऊन जातात.भाट चोराला सुध्दा चोर साहेब म्हणतात भाटयांना चोंबडयाचा नाद असतो.,भाटयांना स्तुती करण्याची कवडीची अक्कल नाही, त्यांनाही राज दरबारी स्थान आहे.अशा प्रकारे समाजाविषयी आक्षपाई बोलुन इतर समाजांसमोर आमच्या समाजाची बदनामी केली. तसेच आमची सांस्कृतीक व धार्मिक बदनामी करून आमच्या समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या.



आयोजन समितीचा या कार्यक्रमाचा हेतु व ह.भ.प. बाळू महाराजांच्या किर्तनाचा विषय यांचा भाट समाजाशी कोणत्याही संबंध नसताना ह.भ.प. बाळू महाराजांनी जाणीवपूर्वक भाट समाजाची बदनामी होईल असे जाहीर विधान केले.यामुळे संपूर्ण भाट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असुन सर्व समाजबांधव या विधानामुळे अतिशय संतप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील तसेच सर्व जिल्हयातील कार्यकारणी व समाज संघटन ह.भ.प. बाळू महाराजांच्या विरोधात आंदोलने छेडण्याच्या पवित्र्यात आहेत. तरी समाज प्रबोधनकार व किर्तनकार ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा व भविष्यात यांना अशा सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी, त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी या आशयाचे निवेदन भाट सामाज तर्फे चोपडा पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांना देण्यात आले यावेळी मिलिंद पांडुरंग भाट – प्रमोद पांडुरंग भाट,मनिष ज्ञानेश्वर भाट, कैलास ज्ञानेश्वर भाट,गोकुल तिलोकचंद भाट,गिरिष सौदागर भाट, संजय कांतिलाल भाट ,संजय भाट हरिष कांतिलाल भाट,राजेंद्र छबिलदास भाट यांचा सह समस्त भाट समाज मंडळी, उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]