महाराष्ट्र 9

२९ गॅसहंडीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत… बेकायदेशीर साठवणूक केल्या प्रकरणी कारवाई…

[espro-slider id=13780]

२९ गॅसहंडीसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत… बेकायदेशीर साठवणूक केल्या प्रकरणी कारवाई…


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपडा तालुक्यांतील वढोदा येथील नरेंद्र छगन पाटील यांनी आपल्या गावातील एका बखळ जागेत स्वता:चे आर्थिक फायद्याकरीता गॅसच्या भरलेल्या टाक्या ह्या टाटा ACE कंपनीचे वाहन कमांक एम एच १८ ए. ए ५१८१ मधुन विक्री करणेसाठी वापरुन सदरच्या गॅस सिलेंडर ह्या मानवी वस्ती असलेल्या ठिकाणी उघड्यावर बेकायदेशीर साठवणुक करुन लोकांना धोका निर्माण होईल व मानवी जिवन धोक्यात येईल अशा पध्दतीने निष्काळजीपणे ठेवलेल्या असतांना मिळुन आला म्हणुन देवेंद्र नेतकर प्र.पूरवठा तपासणी अधिकारी ( तहसिल कार्यालय चोपडा ) यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात ४१/२०२३ भारतीय दंड संहिता कलम २८५ , १८८ सह जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्यात एकूण २९ गॅस सिलेंडरसह टाटा एसीई कंपनीचे वाहन असा एकूण सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमरसिंग वसावे हे करीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]