प्रतिष्ठित डॉक्टर.व व्यापारी यांचा सह अग्रसेन भवन येथे जुगार खेळताना ११जणांना रंगेहाथ पकडले

*कार्यवाहीत एक लाख बारा हजार आठशे सत्तर रुपयाचा मुद्देमाल जप्त*
चोपडा ;- येथील अग्रसेन भवनच्या आवारात अकरा जन जुगार खेळत असतांना पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकाने
अचानक धाड टाकून एक लाख बारा हजार रुपयांचा रोख रकमेसह ऐवज जप्त करण्यात आला आहे.२६ रोजी संध्याकाळी ५:३५ वाजेच्या सुमारास शहरातील एमआयडीसी भागातअसलेल्याअग्रसेनभवनाच्या मोकळ्या ओट्यावर५२पत्त्यांचा जुगार खेळतांना पोलिसांनी छापा टाकून अकरा जणांना रंगेहात पकडले. यात एक लाख बारा हजाराचा ऐवज त्यात ५२ हजार रोख तर ६० हजार रुपये किंमतीचेअकरा मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आलेआहे.याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी सुभाष वासुदेव सपकाळ यांच्या फिर्यादीवरून सुधाकर शांताराम चौधरी (४३) महावीर नगर,डॉ. अभिजित योगराज देशमुख (३४)गणेश कॉलनी,अशोक आसाराम पाटील (५२) भाग्योदय नगर, रितेश विनोद डिसा (३९) गुजराथी गल्ली , राम शंकरलाल सोमाणी (५२) भावसार गल्ली, अजय प्रकाश अग्रवाल (५६) बाळजीमंदिर जवळ चोपडा, अलोक संतोष अग्रवाल (२९) धानोरा, अमोल सुरेश कासार (३८) मोठा देव्हारा, ललीत प्रकाश अग्रवाल (३०) गोलमंदिर, मोतीलाल
गोपाल साळुखे (२९) खरद, विलास मोतीराम सूर्यवंशी (३८) बारगनअली चोपडा या आरोपितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष पारधी हेकरीत आहेत.