महाराष्ट्र 9

प्रताप विद्यामंदिरास राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर..

[espro-slider id=13780]

प्रताप विद्यामंदिरास राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर..

महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा प्रतिनिधी नोबेल फाउंडेशन जळगाव तर्फे दिला जाणारा सन 2023 चा राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल प्रताप विद्या मंदिरास जाहीर झाला आहे.

शाळेमार्फत तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणात आवश्यक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा असून विद्यार्थ्यांचा विकास 105 वर्षापासून करीत असल्यामुळे हा नोबेल विज्ञान पुरस्कार नोबेल फाउंडेशन जळगाव च्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. शाळा अखंड, समृद्ध व सशक्त समाज निर्मितीत योगदान देत आहे


या पुरस्कारा निमित्त संस्थेच्या अध्यक्षा शैलाबेन मयूर, उपाध्यक्ष विश्वनाथजी अग्रवाल, चेअरमन राजाभाई मयूर, सचिव माधुरीताई मयूर, संचालक चंद्रहास गुजराथी, भूपेंद्र गुजराथी, रमेशजी जैन, समन्वयक गोविंद गुजराथी आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]