गांजाची वाहतुक करणाऱ्या एकास अटक; तब्बल ८० हजाराचा मुद्देमाल जप्त..
महाराष्ट्र9 न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीतील चोपडा ते लासुर रोडवर हॉटेल फौजीजवळ रस्त्यावर एक लाल रंगाची बजाज प्लॅटीना विना क्रंमाकाची मोटर सायकलीवर ६०००० रुपये किंमतीचा ६ किलो गांजा एक बॅगेत वाहतुक करतांना रमजान जाबाज तडवी वय ४२ रा. वरगव्हाण हा इसम आढळून आला. त्याच्यावर चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करीत त्याला अटक करण्यात आली आहे. तब्बल ८००००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात ६ किलो गांजा व एक मोटर सायकल यांचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलीसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दि. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चोपडा ते लासुर रोडवरील हॉटेल फौजी जवळ रस्त्यावर आरोपी नामे रमजान जाबाज तडवी वय ४२ रा. वरगव्हाण ता. चोपडा हा स्वतःचे फायदयासाठी कोणास तरी विक्री करण्याचे उद्देशाने त्याचे ताब्यातील एक लाल रंगाची बजाज प्लॅटीना विना क्रंमाकाची मोटर सायकल यावर बॅग मध्ये ६००००/- रुपये किमंतीचा ६ किलो वजनाचा मनोव्यापारावर परीणाम करणारा गांजा हा मादक अंमली पदार्थ स्वतःचे कब्जात बाळगुन वाहतुक करीत असतांना मिळुन आला. त्यामुळे चोपडा शहर सी सी टी एन एस गुन्हा रजि. नंबर ८३/२०२३ एन.डी.पी.एस. अॕक्ट १९८५ चे कलम ८ (ग), २० , २२ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर फिर्याद पो.ना. संतोष पारधी यांनी दिली आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे ,
सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले आदिंच्या मार्गदर्शनाखाली व चोपडा शहर पो.स्टे. प्रभारी सपोनि. अजित सावळे यांच्या नेतृत्वात पोना. विलेश सोनवणे, पो ना संतोष पारधी, पोकाँ. सुमेरसिंग वाघरे व रविंद्र बोरसे आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि. अजित सावळे हे करीत आहेत.






