श्री साई इंग्लिश मेडियम स्कूल येथे ‘वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ” रंग उधळण” उत्साहात संपन्न…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
गलंगी ता.चोपडा येथील सरदार वल्लभभाई पटेल शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित श्री साई इंग्लिश मिडियम स्कूल* येथे वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम ” रंग उधळण” उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विजयकुमार देवचंद पाटिल ( निवृत्त अन्न व औषध निरीक्षक तथा अध्यक्ष इंग्लिश मिडियम स्कूल,किनगांव ) , नरेश चौधरी ( अध्यक्ष – इंम्पिरीयल इंग्लिश स्कूल,पाळधी ) , डाॕ.राहूल पाटिल ( अध्यक्ष – यशोधन चॕरिटेबल ट्रस्ट,चोपडा ) ,वसंत किसनराव पाटिल ( निवृत्त परिमंडल अधिकारी ) मनोहर पंडितराव देशमुख ( अध्यक्ष कै.एस.पी.देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल,अडावद ), संस्थेचे अध्यक्ष कांतिलाल पाटिल,उपाध्यक्ष गोकूळ पाटिल, सचिव सौ.स्नेहलता पाटिल , गलंगीच्या सरपंच शितल देवराज, पत्रकार मच्छिंद्र कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शारदामातेचे पुजन व व्दिपप्रज्वलाने करण्यात आली. कार्यक्रमात शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमात प्राविण्य मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन पुरस्कृत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा शैक्षणिक वार्षिक अहवाल सादर केला.संस्थेचे अध्यक्ष यांनी पुढिल शैक्षणिक वर्षासाठी नवीन भविष्य कालीन योजनांचा परामर्श केला.सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ,ज्यू.केजी.,सिनी.के.जी.व इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी होते.

सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कला-गुणांना वाव देणे .विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आधारीत गीतांवर नृत्य सादर केले. कार्यक्रमात पालकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद दिसून आला.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक उमेश महाजन , डि.एस्.सोनवणे, सी.एस्.सोनार, व्ही.एम.पाटिल, सौ.सुवर्णा देशमुख,सौ.मोनाली महाजन,सौ.यमुना बाविस्कर,शितल पाटिल,दिपाली शिरसाठ व शिक्षकेतर कर्मचारी,स्कूल बस चालक यांनी मेहनत घेतली.






