महाराष्ट्र 9

मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..,

[espro-slider id=13780]

मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात..,


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी


चोपडा व अमळनेर परिसरातील वाढत्या मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी एम. राज कुमार, पोलीस अधीक्षक, जळगांव, चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक, जळगांव, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव, कृषीकेश रावले. सहा. पोलीस अधीक्षक, चोपडा उपविभाग यांनी किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांना मोटार सायकल चोरीचे गुन्ह्यांतील अज्ञात आरोपी निष्पन्न करण्याबाबत मार्गदर्शन सूचना निर्गमीत केल्या होत्या. त्याप्रमाणे किसन नजन पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार पोहेकॉ संदिप रमेश पाटील, पोना.प्रविण जनार्दन मांडोळे, पोना. परेश प्रकाश महाजन, पोकॉ. दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकॉ. प्रमोद शिवाजी ठाकूर अशांचे पथक तयार करुन त्यांना चोपडा व अमळनेर शहर तालुका परिसरातील मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणेकामी मार्गदर्शन केले व परिसरात नियमीत पेट्रोलिंग सुरु ठेवणेस सांगितले.



दि. २२. रोजी पोनि. किसन नजन पाटील यांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम विना क्रमांकाची एचएफ डिलक्स मो.सा. वर चोपडा शहरात फिरत असून त्याचे ताब्यातील मो.सा. चोरीची असल्याबाबत गुप्त माहिती मिळाली आहे. पोनि. किसन नजनपाटील यांनी वर नमूद पथकास तुम्ही तात्काळ सदर ठिकाणी जावून त्या इसमाचा शोध घ्या व बातमीची शहानिशा करा असे कळविल्याने वरील स्था. गु.शा. पथकाने तात्काळ चोपडा शहरात जावून नमूद इसमाचा शोध घेत असता तो चोपडा बस स्टॅण्ड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यास बस स्टॅण्ड मध्ये शिताफिने ताब्यात घेवून त्यास नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव राजेश श्रीराम बारेला, वय २२, रा. मोहनपडावा ता.वरला जि.बडवाणी असल्याचे सांगितले व त्याचे ताब्यातील मो.सा. बाबत विचारणा करता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पथकास त्याचेवर संशय आला म्हणून पथकाने त्यास ताब्यात घेवून सविस्तर विचारपूस करता त्याने त्याचे ताब्यातील मो.सा. चोरीची असल्याचे सांगितले तसेच त्याने चोपडा शहरात दोन व अमळनेर शहरात एक अशा एकूण तीन मो.सा. चोरी केल्याची माहिती दिली आहे.



आरोपीने चोपडा शहरात चोरी केलेल्या मो.सा. संदर्भात खात्री करता चोपडा शहर पोस्टे. गुरनं. ४४१/२०२२ भादंवि. क. ३७९ व गुरनं. ७६/२०२३ भादंवि. क. ३७९ नुसार गुन्हे दाखल असून त्यास रिपोर्टासह पुढील कारवाईकामी चोपडा शहर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलेले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

Read More

ऑनर किलिंगच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे # चोपड्यात सासऱ्याने केला जावई व मुली वर गोळीबार #मुलीचा जागीच मृत्यू #सीआरपीएफमधील सेवानिवृत्त पीएसआय किरण मांगले यांनी केला गोळीबार

[adsforwp id="60"]