सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली बाईक रॅली…
शिवजयंती निमित्त चोपडा शहरात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. सदर बाईक रॅलीस सुरूवात शासकीय विश्रामगृहा पासून सुरूवात करण्यात आली.शहरांतील मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली. रॅलीच्या शेवट छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यातआला. रॅलीत महाराजांच्या जयजयकार करत अनेक घोषणा देण्यात आल्या. हा उत्सव घराघरांत साजरा व्हावा, शिवजयंतीचे महत्व भावी पिढीला कळावे व युवा पिढीने तरुणाईने या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे या हेतूने हि बाईक रॅली काढण्यात आली. त्यामुळे प्रत्येकाच्या घरावर व गाडीवर किमान शिवजयंती दिवशी भगवा झेंडा लावावा. घराबाहेर रांगोळी काढावी असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिवजयंतीला सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात येणार आहे. तसेच दुपारी ४ ते रात्री १० वाजे पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे तरी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.







