महाराष्ट्र 9

चोपड्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या, दोन लाखांचा ऐवज लंपास…#शहर पोलिसांत गुन्हा दाखल…

[espro-slider id=13780]

चोपड्यात एकाच दिवशी दोन घरफोड्या, दोन लाखांचा ऐवज लंपास…
शहर पोलिसांत गुन्हा दाखल…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


चोपड़ा शहरातील बोरोले नगर २ भागात राहत असलेले निवृत्ती प्रल्हाद पाटील तसेच त्यांचे शेजारी राहणारे रोहीदास मुरलीधर पाटील यांचे राहते घराचे कोणी तरी अज्ञात चोरटयांनी कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन निवृत्ती पाटील यांच्या घरातील १,९६,०००/- किंमतीचा मुद्देमाल त्यात ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच १ टीव्ही, 2 पितळी पातले, १ सायकल व २० हजार रुपये रोख तसेच शेजारी राहणारे रोहीदास मुरलीधर पाटील यांचे घरातील ५०००/- रुपये किमतीचे २ पितळी पातले व १ पितळी समई असा एकुण २,०१०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.


घरातील बेडरूम मधील कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व पैसे भामट्यांनी लंपास केले आहेत. त्यात ३०००/- रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टोंगल , ३०००/- रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील काफ , ६००००/- रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याची मंगलपोत , २१०००/- रुपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील साखळ्या , १८०००/- रुपये किमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्यची चैन , १००००/- रुपये किमतीची सॅमसंग कंपनीची एल ई डी ३२ इंच टीव्ही , ३०००/- रुपये किमतीची सायकल,
४०००/- रुपये किमतीचे २ पितळी पातले, २००००/- रुपये रोख त्यात ५०० रुपये दराच्या ४० नोटा व रोहिदास मुरलीधर पाटील यांच्या घरातील २ पितळी पातले व १पितळी समई असा एकूण २,०१००० रू किमतीचा मुद्देमाल लंपास करण्यात भामटे यशस्वी झाले आहेत.


सध्या लग्न – साखरपुडा सोहळे सूरू आहेत त्यामुळे अनेक घरे बंद अवस्थेत आढळून येतात त्याचा फायदा चोर – भामटे घेत आहेत. त्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा व रात्रीची गस्त पोलिसांनी वाढवावी अशी मागणी होत आहे.
सदर गुन्ह्याचा तपास सहा पोलीस निरीक्षक अजित सावळे यांचे आदेशाने गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे हे करीत आहेत…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]