*चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय,चोपडा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे*
पौष्टिक तृणधान्य पे चर्चा..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी तंत्र विद्यालय चोपडा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष साजरे करण्यात आले या कार्यक्रमात तालुका कृषी कार्यालय चोपडा व पंचायत समिती कृषी विभाग चोपडा यांचा मोलाचा सहभाग लाभला तसेच पद्मालय सीड्स मार्फत विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले कार्यक्रम अधिक भरीव होण्यासाठी विद्यार्थ्यांमार्फत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


तृणधान्य एक पौष्टिक आहार या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली तसेच जान्हवी संजय पाटील आहार तज्ञ यांनी आहाराविषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच तृणधान्य संदर्भात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. या कार्यक्रमात मा.दीपक साळुंखे, तालुका कृषी अधिकारी चोपडा व आर.एम पाटील,डी एम शिंपी ,पंचायत समिती चोपडा , संस्थेचे समन्वयक गोविंद भाई गुजराती व डी टी महाजन ,प्रशांत गुजराथी सर मुख्याध्यापक,प्रताप विद्यामंदिर व प्रा.हरिश्चंद्र पाटील प्राचार्य,कृषी तंत्र विद्यालय चोपडा यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एम.जे पाटील व आभार प्रदर्शन प्रा मोहन चौधरी यांनी केले. प्रा.आर एल चव्हाण , प्रा.सी जे पवार ,सौरभ गुजराती ,राहुल महाले यांनी परिश्रम घेतले..






