महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा उत्साहात संपन्न ..
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपड़ा प्रतिनिधी
महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा दरवर्षी इयत्ता दुसरी, इयत्ता तिसरी ,इयत्ता चौथी, इयत्ता सहावी व इयत्ता सातवी वर्गासाठी आयोजित केली जाते. सदर परीक्षा मराठी, सेमी इंग्रजी व इंग्रजी तिन्ही माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केली जाते. मागील वर्षी कोविड काळात सदर परीक्षा ऑनलाईन पदधतीने घेण्यात आली होती.

यावर्षी मात्र बालमोहन विद्यालयात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. इयत्ता दूसरी ते सातवीच्या एकूण ८९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सदर परीक्षेच्या बैठकीचे नियोजन एकूण २२ ब्लॉक मध्ये करण्यात आले होते.केंद्र संचालक म्हणून जळगाव येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी काम पाहिले तर तालुका समन्वयक म्हणून पंकज प्राथमिक विद्यालयाचे आर डी पाटील यांनी काम पाहिले. त्यांना बाळासाहेब पाटील, हर्षवर्धन देशमुख , उदय पाटील, भूपेंद्र माळी यांचे सहकार्य लाभले.


परीक्षेचे पर्यवेक्षण प्रियंका गुलाब कोळी, हर्षाली राजू पाटील, जानवी अशोक पाटील , शुभांगी अनिल पाटील , वर्षा दिनकर करनकाळ , कोमल राजेंद्र पाटील
कोमल भरत पाटील ,रोशनी तुकाराम पाटील , दामिनी रघुनाथ पवार , राहूल देवसिंग बारेला , नेहा भगवान अहिरे ,आकांक्षा विलास पाटील ,मोनिका राजू सरवणे ,देवेंद्र मधुकर वानखेडे , भाग्यश्री राजेंद्र धनगर ,
सपना राजेंद्र धनगर, तृप्ती चंद्रकांत महाजन , नंदिनी राजाराम सपकाळे,कोमल अनिल कुमार ,प्रेरणा चंद्रकांत बारी, दिक्षा किशोर राजकूळे , रोशनी संजय गवळी,
मयूरी अरुण पाटील, माधुरी रविंद्र बाविस्कर, अंकिता सुनिल पाटील,चेतन संजय वाघ , नंदनी संजय वारडे , तुषार किरण वारडे , देवेंद्र वानखेडे , चेतन वाघ आदींनी पर्यवेक्षण केले.

परीक्षेसाठी इमारत संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत अण्णा पाटील व मुख्याध्यापक प्रदिप चौधरी यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल एम टी एस परीक्षा आयोजकांनी आभार मानले आहेत…





