महाराष्ट्र 9

सुसंगत फाउंडेशनच्या वतीने पुण्यात आदर्श माता-पित्यांचा सन्मान सोहळा.#चोपड्याचे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाठ व सरला शिरसाठ सन्मानित…

[espro-slider id=13780]

सुसंगत फाउंडेशनच्या वतीने पुण्यात आदर्श माता-पित्यांचा सन्मान सोहळा.#चोपड्याचे ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र शिरसाठ व सरला शिरसाठ सन्मानित…


महाराष्ट्र9न्यूज चोपडा प्रतिनिधी:-


सुसंगत फाउंडेशनच्या माध्यमातून सत्कार करण्यात आलेल्या आदर्श माता-पित्यांचा सत्कार म्हणजे निधर्मी आणि राष्ट्रवादी भूमिका आहे. या ठिकाणी संस्कारासोबतच मनाची श्रीमंती आहे. दुसरीकडे समाजात वाढत चाललेली वृद्धाश्रमांची संख्या हे संस्कृतीचे अधःपतन आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.


सुसंगत फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श माता पिता सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल तर विशेष अतिथी म्हणून माजी लेखापरीक्षक गोविंद दिघे, श्रीपाद पंचपोर, सुसंगतचे अध्यक्ष डॉ. सु. भ. न्हाळदे, उपाध्यक्ष धोंडीराम गडदे, विश्वस्त तसेच सचिव संगीता न्हाळदे, अॅड. वैशाली करे आदी उपस्थित होते.


दि. २१ जानेवारी रोजी झालेल्या या दिमाखदार सोहळ्यात चोपडा शहरांतील नामांकित व ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ नरेंद्र शिरसाठ व त्यांच्या धर्मपत्नी सरला शिरसाठ ( माजी नगरसेविका ) यांचा सन्मान करण्यात आला. सत्कार करण्यात आलेल्या माता- पित्यांचे लेख असलेल्या ‘संस्कारांचे खरे शिल्पकार या पुस्तकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. आदर्श माता-पित्यांच्या जिद्दीचा प्रवास या पुस्तकात आहे, असे मत डॉ. सबनीस यांनी व्यक्त केले.
सदर दिमाखदार सोहळ्यात सबनीस यांना आदर्श माता – पिता सन्मान देऊन पुरस्काराची खऱ्या अर्थाने उंची वाढली आहे असे मत कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. समाजासाठी काम करत राहा समाजाचे देणे देत राहा, यातूनच आदर्श निर्माण होतात असे मत अॅड. श्रीपाद पंचपौर यांनी व्यक्त केले.


प्रास्ताविक डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी केले.
सूत्रसंचालन जागृती कुलकर्णी आणि माणिक सोनवलकर यांनी केले. तर आभार सानिका कुलकर्णी या विद्यार्थिनीने मानले. एस. एम. जोशी सभागृहात हा कार्यक्रम मोठया दिमाखदार संपन्न झाला….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]