महाराष्ट्र 9

अवैधरित्या दारुची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह दोन आरोपी जेरबंद
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई !

[espro-slider id=13780]

अवैधरित्या दारुची वाहतूक करतांना चारचाकी वाहनासह दोन आरोपी जेरबंद
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनची कारवाई !


महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-


जिल्हयात अवैद्य धंदयावर प्रतिबंध करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करण्याबाबत सूचना देवून योग्य ती कारवाई करणेबाबत जिल्हयातील सर्व उविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना वरिष्ठांकडून आदेश निर्देशीत केले होते. या अनुषंगाने सपोनि. संदिप दुनगहू यांना दि. २३ जानेवारी रोजी सांगवी (शिरपूर) कडून एक महिंद्रा बोलेरो या चारचाकी वाहनामध्ये अवैद्यरीत्या बिअर वाहतूक होत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी त्याठिकाणी तातडीने पथक पाठविण्यात आले. संबंधित चारचाकी वाहनाची तापासणी केली असता त्यामध्ये तब्बल ८४ हजार रुपये किंमतीच्या बिअरची अवैद्यरित्या वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. बिअरची वाहतुक करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यात एकुण ४,८४००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी सपोनि. संदिप दुनगहू यांना गुप्त बातमिदारामार्फत बातमी मिळाली की, दि. २३ जाने २०२३ रोजी सांगवी ता. शिरपूर कडून एक महिंद्र बोलेरो गाडी क्र एम एच – १९ ए पी – ०९६५ मध्ये अवैधरित्या बिअरची वाहतूक होत आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पोहेकॉ. लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ. राकेश पाटील, पोकॉ. प्रमोद पारधी, पोकॉ. विनोद पाटील यांना त्याठिकाणी जावून कारवाई करणेबाबत सांगितले. सदर पथक सरकारी वाहनाने त्याठिकाणी रवाना होवून खा-यापाडा गावाचे हद्दीत लहान पुलाजवळ जावून पाहणी केली असता मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सुमारे दुपारी १७.४५ वाजेच्या सुमारास एक बोलेरो गाडी क्र. एम एच -१९ ए पी – ०९६५ येतांना दिसली असता तिची तपासणी केली तर त्यामध्ये माऊंटन ६००० सुपर स्ट्रॉग कंपनीच्या ५०० मिली मापाच्या अॕल्युमिनीयमचे टिन असलेले ३५ खोके एका खोक्यात २४ डब्बे असे एकुण ८४० डब्बे (बाटल्या) एका डब्ब्याची किंमत रुपये १०० दराने एकुण ८४,०००/- रु किंमतीच्या बिअरची अवैद्यरित्या वाहतुक करीत असतांना आरोपी नामे परशुराम रिता बारेला, वय ३३ वर्षे, रा. जिरायतपाडा ता. चोपडा दिलीप नारायण बारेला, वय ४० वर्षे, रा. देवझीरी ता. चोपडा हे मिळून आले. या अनुषंगाने दोघांवर गुन्हा दाखल झाला असून गुन्हयात एकुण ४,८४०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


सदर कारवाई पोलीस अधीक्षक एस. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक जळगांव चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले यांचे मार्गदर्शनाखाली चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे स पो नि संदिप दुनगहू, पोहेकॉ. लक्ष्मण शिंगाणे, पोहेकॉ. राकेश पाटील, सफौ. देविदास ईशी, पोहेकॉ. भरत नाईक, पोहेकॉ. शिवाजी बाविस्कर, पोहेकॉ. राजु महाजन, पोना. शशिकांत पारधी, चालक पोकॉ. विनोद पाटील, पोकॉ. प्रमोद पारधी आदिंच्या पथकाने केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहेकॉ. लक्ष्मण शिंगाणे करीत आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]