मुस्तफा अँग्लो उर्दू स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न…
महाराष्ट्र9न्यूज नेटवर्क चोपडा प्रतिनिधी:-
मुस्तफा एज्युकेशन सोसायटी चोपडा संचलित मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व ज्युनियर कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. शिक्षण काळाची गरज’, आधुनिक शिक्षण , शेतकरी आत्महत्या, बेटी बचाव – बेटी पढाव ,लोकनृत्य,आदिवासी नृत्य, मूक नाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनास शाळेतील तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.


सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी पालक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष असगर अली महेबूब अली यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष , संचालक मंडळ उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक अंजुम अहमद शेख व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक तनवीर अहमद शेख यांनी स्नेह संमेलन प्रमुख म्हणून काम पाहिले. तर अब्दुल हक सर, महमूद सर, डॉ अजहर सर , सईद शेख ( कनिष्ठ लिपीक ) व शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले…






