
लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले असून देखील अमळनेर येथे लॉकडाऊन कालावधीमध्ये विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे आमदार अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अमळनेर शहरात तपासणी मोहीम हाती घेतली. यामध्ये अमळनेरात एकूण २५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ दुकानदाराविरुद्ध मद्य साठा तफावत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात संचारबंदी आणि लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी/विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असूनही जिल्ह्यात काही ठिकाणी चोरी-छुपे दुकानं सुरु केली जात आहे. दरम्यान, अमळनेरात विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री करण्यात आल्याचे आ. अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी अमळनेर शहरात तपासणी मोहीम हाती घेत अमळनेरात एकूण २५ दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ दुकानदाराविरुद्ध मद्य साठा तफावत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
