
प्रतिनिधी | चोपडा
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापूराव यांनी कळलेल्या माहितीनुसार चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या दूरध्वनीवरून माहिती मिळाल्या नुसार चोपडा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी एका इसमास गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तालुक्यातील चुंचाळे गावी रंगेहात पकडून गावठी कट्टा ताब्यात घेऊन कारवाई केली असून अज्ञात तीन जणांना देखील पोलिसांनी अटक केली आहे.
सहायक पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक लोकरे याच्या सूचनेनुसार पो हे कॉ जितेंद्र सोनवणे,पो जे कॉ सुनील पाटील,पोलीस नाईक संतोष पारधी,पो ना विलेश सोनवणे ,पो कॉ प्रकाश मथुरे ,पो कॉ योगेश शिंदे ,पो कॉ प्रमोद पवार,पो कॉ रवींद्र पाटील,पो कॉ हेमंत कोळी यांनी दि २१ रोजी वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार चुंचाळे गावी बस स्थानक परिसरात दि २१ रोजी सापळा रचून रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास आरोपी मनीष किशोर पाटील(२५) रा खोटे नगर,जळगाव मध्यप्रेदश मधील उर्मर्टी गावाकडून येत असताना त्याच्या ताब्यातून त्याचे कमरेला लावलेला २५ हजार किमतीचा गावठी बनावटीची मेड इन यू एस ए लिहेलला मिळून आल्याने सदर आरोपीस रंगेहाथ पकडले होते.यावेळी त्याचे सोबतीचे अन्य तीन जण आधाराच्या फायदा घेऊन पळून गेले होते त्याना देखील लगेच अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले होते.यात गजेंद्र युवराज सूर्यवंशी(२०),तेजस अरुण पाटील(१९)रा खोटेनगर जळगाव, प्रशांत गुलाब पवार(धनगर)(२५)रा पाळधी ता जळगाव याना देखील अटक करून आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधीश मस्के यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेचा पूढील तपास पोलीस निरीक्षक विनायक लोकरे करीत आहेत