
प्रतिनिधी रावेर निंभोरा बुद्रुक ता.रावेर येथिल रहिवाशी हल्ली मुक्काम फैजपूर येथिल जेष्ट पत्रकार तथा संपादक, लेखक, माजी निंभोरा ग्रा.प.स भास्कर दौलत महाले यांच्या परिवारावर नियतीचा घात. परवा दि.२० रोजी लहान मुलगा सुधिर भास्कर महाले वय ३४ याचा धानोरा जवळ कार अपघातात जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्यावर दि.२१ रोजी निंभोरा येथे दुःखद वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या चितेची अग्नी अजून शांत होतेच तोवर नियतीने घात करून मुलाच्या तिसऱ्या दिनीच पुत्र शोकात आई सौ.मगला भास्कर महाले वय ५५ ने ही प्राण सोडला. हि वार्ता कळताच मोठा मुलगा संदिप महाले याने हंबरडा फोडत बेशुद्ध पडला सामान्य जनमानसालाही गहीवरून आननारी ही घटना. या आई मुलाच्या मृत्यूने निंभोरा सह फैजपूर व पंचक्रोषीत हळ हळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक कळा पसरली आहे. त्यांच्यावर दि.२२ रोजी दुपारी ०४ वाजेला अत्यंत दुखःद वातावरणात निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पति, मुलगा, सुना व नातवंडे असा परिवार असून त्या जेष्ट पत्रकार तथा संपादक, लेखक व निंभोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य भास्कर दौलत महाले यांच्या पत्नी होत.
