
अमळनेर:-शहरातील साळीवाडा परिसरात राहणाऱ्या एका कोरोना संशयित महिलेचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असताना त्या मयत महिलेसह तिच्या पतीचाही अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अमळनेर शहरात खळबळ माजली आहे,आता अमळनेर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली आहे.जळगाव येथे उपचार घेत असतांना त्या महिलेचे निधन झाल्यानंतर महिलेचा तपासणी अहवाल येणे बाकी असतानाच दक्षता म्हणून महिलेच्या निवासस्थानापासून एक किमी झोनची फवारणी करण्यात आली होती.त्यानंतर महिलेचा तपासणी अहवाल येण्याची प्रतीक्षा सुरू होती,याव्यतिरिक्त त्या महिलेचा पती देखील जळगाव येथे रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना त्याचीही कोरोना तपासणी करण्यात आली होती,अखेर त्या दोन्ही पती पत्नीचे अहवाल आज रात्री कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांनी दिल्यानंतर प्राशसन खळबळून जागे झाले.
*अमळनेरात रात्रीच प्रांतांच्या दालनात तातडीची बैठक…*
सदर महिलेने सुरवातीलाशहरातील काही खाजगी रुग्णालयात उपचार घेतले असल्याचीही माहिती मिळाली आहे.दि 18 मार्च रोजी तिचा मुलगा पुणे येथून अमळनेर येथे आला होता,कोरोना सायलंट कॅरीअर म्हणून त्यापासूनच ही लागण झालेली असावी शक्यता वर्तविली जात आहे.पॉझिटिव्हची गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या दालनात रात्री 10 नंतर तातडीची बैठक घेण्यात आली,यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ,डीवायएसपी राजेंद्र ससाणे,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,बीडीओ संदीप वायाळ,न प च्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड,आरोग्य अधिकारी डॉ गिरीश गोसावी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे,डॉ विलास महाजन,न प चे आरोग्य निरीक्षक वाय एस चव्हाण, उपस्थित होते,रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती,सदर बैठकीत महिलेच्या निवासस्थानापासून संपूर्ण चौफेर एक किंमी चा परिसर सील करण्यासदर्भात चर्चा झाली.दरम्यान सदर पती व पत्नीचे शहरातील शिवाजी मार्केट येथे किराणा दुकान आहे.सदर कुटुंबातील आठ लोकांना स्वब घेण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.