कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी गिरवताहेत अॉन-लाईन धडे.

चोपडा-(प्रतिनिधी)
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रबोधिनी मंडळ,चोपडा संचलित कै.हि.मो.करोडपती माध्यमिक विद्यालय,चोपडा येथील विद्यालयातील विद्यार्थी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणुन शासनाने जाहिर केलेल्या लॉकडाऊन काळात शाळा बंद असतांनाही विविध शैक्षणिक अॕपच्या माध्यमातून शासनाच्या स्टडी फ्राॕम होम उपक्रमाअंतर्गत अध्ययन करीत आहेत.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.व्ही.पाटील मँडम यांचे संकल्पनेतुन विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संपर्क व्हावा व शैक्षणिक आणि सामाजिक जाणिवांचे आदान-प्रदान होऊन शाळा अधिक लोकाभिमुख होणे संदर्भात विद्यार्थी व पालकांचे व्हाॕट्स-अप गृप तयार केले आहेत.त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी घरी असल्याने प्रामुख्याने अवांतर वाचन,वाचन कौशल्य विकसित करणे,इयत्ता-५ वी ते इयत्ता-१० वी साठी सर्व विषयांचे गृहपाठ,प्रश्नपत्रिका,चाचणी,शैक्षणिक उपक्रम,कृतीपत्रिका प्रारुप,घटकनिहाय गुणविभागणी,काही महत्त्वाच्या घटकांचे व्हिडिओ-अॉडिओ किंवा पी.पी.टी,तसेच शिक्षकांनी विविध प्रशिक्षणातुन अभ्यासलेले प्राप्त शैक्षणिक साहित्य प्रत्येक दिवशी पाठवले जात आहे.त्यातुन विद्यार्थ्यांना आवड निर्माण होत असुन आपणांस सुटी आणि घरातुन बाहेर न पडताही उत्तम पद्धतीने मनोरंजक-आनंददायी पद्धतीने अभ्यासही होत असल्याबाबतचे समाधान पालकांकडून व्यक्त होत आहे. अर्थात इ.५वी ते इ.९वी चा अभ्यासक्रम १४ मार्च पर्यत पुर्ण झाला होता.मार्चच्या महिना अखेरीस संकलित मुल्यमापनाच्या म्हणजेच द्वीतिय सत्र परीक्षा सुरुही होणार होत्या.परंतु कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शाळांना शासन-निर्णयामुळे याआधीच सुट्या जाहिर झाल्या.
याकाळात शासनाकडुन प्राप्त सुचनांनुसार मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली पालक विद्यार्थी यांना प्रत्यक्ष फोन करुन व्हाॕट्स-अप.एस.एम.एस.च्या साह्याने कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या.
तसेच जळगांव जिल्हा शिक्षण-प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट च्या स्टडी फ्राॕम होम या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता,कौशल्यांचा विचार करुनच त्यांना पेलवेल,शक्य होईल असाच अभ्यास वेगवेगळ्या शैक्षणिक अॕप,लिंक्स,पाठ्यपुस्तकातील क्यु-आर कोड स्कॕनिंगच्या मदतीने दिला जात आहे.यांस विद्यार्थीही उत्तम प्रतिसाद देत आहेत.
या उपक्रमाचे पालक वर्ग तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री विठ्ठल ओंकार पाटील,उपाध्यक्ष श्री.सोमनाथ बडगुजर,सचिव श्री व्ही.एच.करोडपती विद्यालयाचे शालेय समितीचे चेअरमन श्री यु.एच.करोडपती,कै.ओंकार गोविंदा पाटील माध्यमिक विद्यालय,कुंड्यापाणी-बिडगांवचे शालेय समिती चेअरमन श्री विनायक ओंकार पाटील व संस्थेचे संचालक मंडळ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मागासवर्गिय वसतीगृहाचे चेअरमन श्री पंकज बडगुजर आणि गटशिक्षणआधिकारी श्रीमती भावनाताई भोसले मँडम यांनी शाळेतील मुख्याध्यापक-शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारींचे अभिनंदन केले आहे.