चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या वतीने तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन

चोपडा (प्रतिनिधी):- चोपडा शहरातील किराणा व जीवनावश्यक वस्तू चा दुकान उघडण्याची वेळ ११ते५ ही ग्राहकाचा गैरसोयीची आहे. कोरोना संसर्ग वाढू नये याकरता संचारबंदी लागू असल्यामुळे ग्रामीण भागातील बस आणि रिक्षा बंद असल्यामुळे ग्राहकांना पाई गावात यावे लागत आहे दुपारी उन जास्त असल्यामुळे ग्राहकांचा गैरसोयीची वेळ आहे तरी सदरची वेळ बदलून सकाळी ८ते २करण्यांत यावी अशी मागणी चोपडा तालुका व्यापारी महामंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी अमृत सचदेव(अध्यक्ष) ,संजय श्रावगी (उपाध्यक्ष), उपस्थित , अनिल वानखेडे(सल्लागार),नरेंद्रतोतला(सेक्रेटरी),सुनीता सचदेव व चोपडा तालुका व्यापारी महामंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते