महाराष्ट्र 9

भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना धमकी देणाऱ्यावर कठोर कार्यवाही व्हावी चोपडा तालुक्याचे तहसीलदारांना निवेदन

[espro-slider id=13780]

चोपडा (प्रतिनिधी ):- भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना भ्रमणध्वनी चे संदेशा द्वारे धमकी देणाऱ्या माथेफिरूवर कठोर कार्यवाही करण्या संदर्भात भारतीय जनता पार्टी चोपडा तालुक्याचे वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
सदर निवेदनात जळगाव येथील व्यंकटेश नगरातील रहिवासी राजेंद्र आर पवार याने भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांना भ्रमणध्वनी चे संदेशा द्वारे 33 दिवसांनी खुनाची धमकी दिलेली असून या माथेफिरूवर प्रशासन व पोलीस खात्याने कठोर कार्यवाही करावी असे नमूद केले असून निवेदनावर भारतीय जनता पार्टी चोपडा तालुका अध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जयस्वाल, मा.पं. स.सभापती आत्माराम भाऊ म्हाळके , जि प सदस्य गजेंद्र सोनवणे,सरचिटणीस चंद्रकांत धनगर, डॉ. मनोहर बडगुजर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक,प्रसिद्धी प्रमुख यशवंत जडे, हिम्मत पाटील जेष्ठ सदस्य,व्यापारी संघटना प्रमुख हेमंत जोहरी, ओबीसी सेल चे सुरेश चौधरी पदाधिकारी बापुराव पाटील इत्यादींच्या स्वाक्षरी आहेत.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]