
चोपडा (प्रतिनिधी):-आज दि.१० एप्रिल रोजी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्यक्ष ग्राऊंडवर काम करणाऱ्या चोपडा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तसेच चोपडा ग्रामीण व चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यानच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन आवश्यक असणाऱ्या सँनिटायझर वाटप चोपडा शहरातील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अँड भैय्यासाहेब संदिप सुरेश पाटिल यांच्या आदेशाने म.गा.शि.म.सचलीत श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यांनी नगरपालीका तसेच शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वाटप करण्यात आले. सदर वाटपा प्रसंगी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री लोकरे साहेब व ग्रामीणचे पोलिस निरीक्षक श्री संदिप अराक साहेब तसेच नगरपालीका आरोग्य निरीक्षक श्री व्ही के पाटिल तसेच लेखापाल संतोष पुणेकर , श्री ज्ञानेश्वर चित्रकती,श्री रमेश बाविस्कर ,श्री प्रताप बाविस्कर ,श्री नरेद्र हाके हे हजर होते.
