चोपडा शहरात एनजीओ संस्थांचे कार्य गौरवास्पद–दौलत निमसे व तहसिलदार गावीत याचे कडून प्रशंसा

प्रतिनिधी | चोपडा
चोपडा शहरात अनेक जण सामाजिक संघटना मदतीसाठी पुढे आले आहेत.अन्न पाकीट देऊन किराणा भरून दिले आहे.चोपड्यात मदती बाबत कुठेही तक्रार नसून उत्तम काम सातत्याने सुरू आहे.सर्व सामाजिक संस्था व मित्र मंडळाचे आभार यावेळी चोपडा तहसीलदार अनिल गावीत यांनी व्यक्त केले.
**चोपडा शहरात एनजीओ संस्थांचे कार्य गौरवास्पद–दौलत निमसे
हे कोरोना आजाराचे संकट साधारण आहे.मी सातारा सांगली पुरग्रस्तांसाठी मदतीसाठी मी थांबलो होतो.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्यांना मदत करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.चोपड्यात कुठेही कोणाचा स्वार्थ दिसून येत नाही.कोरोना आजाराचा बाहु करून घेऊ नका,लोकांमध्ये जनजागृती करा.एनजीओ म्हणून आपण काळजी घ्या.मदत करण्यापूर्वी बाहेर पडताना पोटभरून जेवण करा,सोबत सैनिटायझर ठेवा.आकडा हा झपाट्याने वाढतो आहे,सोशल डिस्टन ठेवणे गरजेचे आहे असे मत जळगाव सामान्य रुग्णालयाचे मानसिक आरोग्य कार्यक्रम प्रमुख दौलत निमसे यांनी सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशि बोलताना सांगितले.यावेळी जळगाव येथील मनोज ननवरे,चंद्रकांत ठाकूर व चोपडा तहसिल कर्मचारी उपस्थित होते.
ज्या तरुण बांधवांनी ,मित्र मंडळांनी कोरोना आजराच्या संचारबंदी काळात चोपडा शहरात मदत करीत आहेत अश्या स्वयंसेवक बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी जळगाव सामान्य रुग्णालयाची टीम आज चोपड्यात आली होती.त्यांनी चोपडा बाजार समितीत थांबलेल्या पन्नास आदिवासी जणांशी संवाद साधला होता.