चोपड्यात भाजपने वर्धापन दिनी केले ५६ बाटल्या रक्त संकलन

चोपडा – देशात भारतीय जनता पक्षाचा ४० वा वर्धापन दिन वेगवेगळ्या समाजसेवी कार्यक्रमांनी साजरा होत असतांना चोपडा शहर भाजपने पक्ष कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करुन ५६ कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या बाटल्या संकलित केल्या.शासन व पक्षाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे सोशल डिस्टन्सींग आणि जमावबंदी कायद्याचे पुरेपूर पालन यावेळी करण्यात आले.
तसेच उमर्टीचे माजी सरपंच डॅा.नाना सोनार यांनी कोरोना संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवहानाला प्रतिसाद देत रुपये ५१००/- चा धनादेश शहराध्यक्ष जायस्वाल यांच्याकडे सुपूर्द केला.
भारतात नव्हे तर संपूर्ण जगात covid-19 या विषाणूने जे काही थैमान घातले आहे. त्यासाठी आपल्या भारतात जे काही कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. त्यांना भविष्यात रक्ताची अडचण भासवू नये म्हणून भारतीय जनता पार्टी चोपडा शहरने वर्धापनदिनानिमित्त रक्तदान शिबिर घेतले. भारतात लॅाकडाऊन असल्यावरही आणि covid-19 चा प्रादुर्भाव असल्यावरही आपल्या जळगावच्या रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ. अतुल पाटील,भरत गायकवाड, सुरज पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील अनमोल सहकार्य केले.या रक्तदान शिबिरात प्रामुख्याने उद्योजक बापू महाजन,जेष्ठ पत्रकार श्रीकांत नेवे,प्रा.शरद पाटील आदिंनी रक्तदान केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष राजू शर्मा, मुन्ना शर्मा ,शहराध्यक्ष गजेंद्र जायस्वाल, सरचिटणीस डॉ. मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष तुषार पाठक, शेतकी संघाचे माजी व्हॅा. प्रेसिडेंट हिम्मतराव पाटील, सुतगिरणीच्या संचालिका रंजना नेवे, वंदना पाटील, माधुरी अहिरराव, अनिता नेवे,रंजना मराठे, रत्ना लोहार, आरती माळी, हेमंत जोहरी, सुरेश चौधरी, गोपाल पाटील, योगेश बडगुजर, मोहित भावे, रितेश शिंपी, विशाल भोई, अजय भोई, विशाल भावसार ,डॉ विकी सनेर, बाळू पाटील, धीरज सुराणा, राज घोगरे,विशाल म्हाळके, सागर गुजर, प्रवीण चौधरी, लक्ष्मण माळी, राजेंद्र खैरनार, जोगिंदर सिंग जोहरी, सुनील पाटील, प्रवीण चौधरी व कार्यकर्ते यांनी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजे दरम्यान उपस्थिती लावली.
तालुक्यात विविध कार्यक्रम
तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांच्या आवहनाला कार्यकतर्ग्यांनी प्रतिसाद देवून भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या ध्वजाचे ध्वजवंदन व ध्वजारोहण केले.सामान्य जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या लढतीत पंतप्रधान निधीला भरघोस मदत करण्याचे आवाहन केले.त्याला मोठा प्रतिसाद देखील प्राप्त झाला.