मध्य प्रदेश मधील कामगाराना यशोधन चैरिटेबल ट्रस्ट तर्फे अन्नदान

देशात लॉकडाऊन मुळे विविध शहरात कामासाठी गेलेले मजूर उपासमारीमुळे आपल्या आपल्या गावी पायी निघाले आहेत असेच आज नाशिक येथून काही मजूर परिवार त्यांच्या लहान लहान मुलासह पायी जात असताना अजेंतेसीम येथील सरपंच कांतिलाल पाटील यांनी यावल रोडवरून पायी जातना बघितले त्यांनी विचारपुस केली असता जवळपास 6 ते 7 दिवस पासून नाशिक हुन पायी निघालेले होते सकाळ पासून फक्त नाश्ता केला होता त्यांनी सामाजिक बांधिंलकी जपणारे यशोधन चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ राहूल पाटील यांना कळविले असता त्यांनी या लोकानां जेवणासाठी थांबवावे असे सांगितले आणि सर्व मजूर परिवाराना जेवण देऊन व लहान मुलाना बिस्किट देऊन मानवतेचे दर्शन देत मध्यप्रदेश मधील त्यांच्या मूळ गावाकडे पुढे रवाना झाले. या प्रसंगी अजेंतेसीमचे सरपंच कांतिलाल पाटील, अजय राजपूत माजी शहर उपाध्यक्ष बीजेपी चोपड़ा, चंदू पाटील,प्रशांत सोनवणे सर,पंकज पाटील, दिनेश नाथबुवा यांनी सहकार्य केले.
