महाराष्ट्र 9

चोपडा तालुक्यातील”त्या”मयत कोरोना संशयितचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

[espro-slider id=13780]

जळगाव- जिल्हा रुग्णालयात दाखल चोपडा तालुक्यातील वृद्ध कोरोना संशयित रुग्णाचा ३० रोजी मृत्यू झाला होता .त्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे .

येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतापर्यंत ७९ संशयित रुग्ण दाखल झाले होते. त्यापैकी ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा देणारी बाब आहे. जळगाव शहरात कोरोना या विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळून आलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत २११६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १९६ रुग्णांची स्क्रिनिंग करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आतापर्यंत ७९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत त्यापैकी ७४ जणांचे तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तपासणीचे २ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर दोन रुग्णांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले होते . दरम्यान २ रुग्ण नव्याने दाखल झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]