संचारबंदी काळात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश
उल्लंघन,चोपड्यात बारा जणांवर गुन्हा दाखल

चोपडा ( प्रतिनिधी )—–
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्या पासून देशात व राज्यात लॉकडाऊन असून संचारबंदी जारी करण्यात आलेली आहे तसेच
जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात आले असून जमावबंदी आहे.संचारबंदी काळात
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्या
प्रकरणी चोपड्यातील बारा जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने
नागरिकांमध्ये खडबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहरात
लॉकडाऊन असून,संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे.जमावबंदी असतांना दिनेश बापू
बाविस्कर (४०) रा.थाळनेर दरवाजा चोपडा,
रउफ शहा उमर शहा (४७) फकिरवाडा चोपडा
संदीप अरुण माळी (२४) फुले नगर चोपडा,
भरत दौलत पाटील (५५),सुभाष शामराव वाघ
(५०),संतोष निंबा निकम (४१) सर्व राहणार पंचाळेश्वर गल्ली चोपडा,दीपक देविदास पाटील (३९),रोहिदास रामलाल पाटील (२५),
परेश मोहन बडगुजर सर्व राहणार सुंदरगढी
चोपडा,मोतीलाल लहानू न्हावी (६०), नाना चैत्राम पाटील (५० ),पांडुरंग राजाराम पाटील
(५९) सर्व राहणार चुंचाळे ता.चोपडा हे काही
एक उद्देश नसतांना फिरतांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने भादवि कलम १८८ अन्वये वरील सर्व बारा जणांवर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक
लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.