महाराष्ट्र 9

दिलासादायक:जिल्ह्यातील एकमात्र कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सर्वाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

[espro-slider id=13780]

दिलासादायक:जिल्ह्यातील एकमात्र कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील सर्वाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह

जळगाव : शहरातील मेहरूण परिसरामधील कोरोनाग्रस्ताच्या संपर्कातील २३ जणांसह प्रलंबित असलेल्या ४ असे एकूण २७ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जळगावकरांना दिलासा मिळाला आहे.

शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जिल्हा रुग्णालयात कोरोना संसर्ग कक्षात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु आहे.त्यांच्या संपर्कातील २० जणांसह जिल्हारुग्णालयात दाखल नवीन संशयित अशा २७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. पॉजिटिव रुग्णाच्या संपर्कातील संशयितांच्या तपासणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते, हे तपासणी अहवाल मंगळवारी दुपारी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले . पॉजिटिव रुग्णांच्या संपर्कातील संशयितांसह इतर सर्व सर्व २७ जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती डॉ. भास्कर खैरे यांनी माहिती दिली.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]