भारतीय जैन संघटना तर्फे गरजूंना नास्ता चहा वाटप

चोपडा – कोरोना विषाणूमुळे जगभर पसरलेल्या आजारामुळे देशभर लॉकडाऊन असल्याने पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, न.पा.कर्मचारी, तसेच हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब जनतेला रोजगार बुडाला आहे. त्यामुळे त्यांची होणारी अडचण लक्षात घेऊन चहा,नास्ता,बिस्किटेची सोय येथील भारतीय जैन संघटनातर्फे करण्यात आली आहे.
शहराच्या शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन व संचारबंदीच्या कामासाठी ड्युटीवर आलेले कर्मचारी महसूल विभागाचे कर्मचारी,नगरपालिकेचे कर्मचारी व इतरत्र कर्मचाऱ्यांना चहा,बिस्किटे , नास्त्यात उपमा,पोहा, शेवचिवडा, साबुदाणा खिचडी, आदी गरम – गरम बनवून आहे त्याठिकाणी जाऊन भारतीय जैन संघटनेचे कार्यकर्ते वितरीत करत असतात संघटनेच्या या कार्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व जैन समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली आहे

भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष क्षितिज चोरडिया, सचिव दिनेश लोडाया, विभागीय जनसंपर्क प्रमुख लतीश जैन, जेष्ठ सदस्य दीपक राखेचा, मिलिंद खिलोसिया, नितीन बरडीया, निर्मल बोरा, आदेश बरडीया, शुभम राखेचा, राहुल राखेचा आदीनी मेहनत घेतली