भाजप नेते घनश्याम अग्रवाल याच्या कडून कोरोना ग्रस्तांच्या मदतीसाठी एक लाखाची मदत

प्रतिनिधी | चोपडा
येथील भाजप चे माजी केंद्रीय समिती सदस्य तथा जेष्ठ नेते घनश्याम अग्रवाल यांनी आज देशात व राज्यात कोरोना मुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आज चोपडा तहसीलदार अनिल गावीत याच्या कडे भरीव अशी मदत देऊन आपले औदार्य दाखवले आहे.
आज दुपारी एक वाजता घनश्याम अग्रवाल यांनी तहसीलदार अनिल गावीत याच्या कडे मुख्यमंत्री सहायता निधीत पन्नास हजार व पंतप्रधान सहायता निधीत पन्नास हजार असे एकूण एक लाखाचा धनादेश दिला आहे.
यावेळी त्याच्यासोबत उद्योजक करण अग्रवाल, घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे सदस्य दोडे गुजर समाजाचे विश्वस्त प्रवीण पाटील,सागर पठार आदी उपस्थित होते.

यावेळी घनश्याम अग्रवाल यांनी तहसीलदार अनिल गावीत यांचेशी बोलताना सागितले की शासनाकडून ज्यांना अन्न धान्याचा लाभ मिळत नाही,ज्यांना खरोखर गरज आहे अश्या लोकांची नावे आम्हाला द्यावीत आम्ही आमच्या परीने त्याच्या पर्यत पोहचून योग्य ती मदत करणार आहोत.दैनिक भास्कर समूहाच्या आवाहनाला देखील घनश्याम अग्रवाल यांनी अकरा हजार रुपये दिले आहेत.
यापूर्वी देखील केरळ येथील पुरग्रस्तांसाठी तहसीलदार याचे कडे पन्नास हजार व सातारा सांगली पुरग्रस्तांना अन्न धान्य पोहचवण्यासाठी मदतीचा हात घनश्याम अग्रवाल यांनी दिला होता.
यावेळी तहसीलदार अनिल गावीत यांनी घनश्याम अग्रवाल व त्याच्या मित्र मंडळाचे विशेष आभार व्यक्त केले होते.