किराणा घेण्यासाठी वेळेचं बंधन नाही,तसे केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला .

जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ ठरवून दिलेली नाही. ते किराणा जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी जाऊ शकतात. त्याला वेळेचे बंधन नाही.सर्व पालिका मुख्याधिकारी, पोलिसांनीही किराणा घेण्यासाठी वेळेचे बंधन घालू नये, तसे केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला आहे .
जिल्ह्यात भुसावळ,बोदवड,मुक्ताईनगर,जामनेर चोपडा सह अनेक पालिका, नगरपरिषद क्षेत्रात नागरिकांना किराणा, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी सहा ते दहा किंवा दुपारी चार ते सात अशी वेळ दिली आहे.यावेळेतच किराणा खरेदीची सक्ती केली जात आहे. यामुळे नागरिकांची एकच गर्दी किराणा दुकानात, भाजीपाला खरेदीच्या ठिकाणी होत आहे. “कोरोनो’त नागरिकांना जवळ एकत्र येऊ न देणे यासाठी संचारबंदी आहे. मात्र अनेक नगरपालिकांचे मुख्याधिकाऱ्यांनी वेळेचे बंधन दिले आहे. त्यावेळेनंतर किराणा घेण्यासाठी नागरिकांना पोलिसांचा चोप खावा लागतो.