कोरोना विरूद्ध युद्ध जिंकायचं असेल तर तर प्रशासनाला साथ द्या नियम पाळा

नागरिकांना कोरोना विषाणू पसरू नये यासाठी लावण्यात आलेल्या संचारबंदी बद्दल काहीच गांभीर्य दिसत नाही आहे.हुल्लडबाजी करणारे युवक गल्लोगल्ली कडेला उभे राहून शासनाच्या निर्णयाची खिल्ली उडवत आहे.प्रशासना कडून वारंवार सूचना देऊन सुधा काही टवाळखोर रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहे
कोरोना व्हायरस पसरू नये म्हणून मंदिर मधील पूजा लोक घरीच करत आहे.तर मस्जिद मध्ये नमाज न पडता घरीच नमाज अदा करीत आहे. या प्रकारचे मोठे बलिदान समाजाकडून केले जात आहे, ते पण टवाळखोर तरुणांना झुंड करून फिटण्यात मजा येत आहे.
शासनाने संचारबंदी ही जनतेच्या आरोग्याला धोका होऊ नये यासाठी केली आहे.
पोलीस असो किंवा डॉक्टर असो आपले जीव धोक्यात टाकून ते आपले काम करत आहे. या कोरोना विरूद्ध च्या महायुद्धात आपल्या सहकार्याची गरज आहे.नागरिकानी घरात राहून संचारबंदीचा काटेकोर पालन करून आपल्यासाठी लढणाया या लोकांना आपण सहकार्य करू शकतो.