चोपडयातील परदेशातून आलेल्या दोघांची जळगाव सामान्य रुग्णालयात तपासणी – चौदा दिवस घरी राहण्याचा दिला सल्ला

चोपडा – शहरातील दोन नागरिक परदेशातुन आल्याने त्यांची वैदकीय तपासणी करण्यासाठी त्यांना जळगाव सामान्य रुगणालयात आज (शुक्रवार) रोजी पाठविण्यात आले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली नसून पुढील चौदा दिवस घरीच राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. तसेच एक नागरिक कालच अबुधाबी येथून आल्याने त्याला देखील जळगाव सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी जावे असा सल्ला चोपडा उपजिल्हा रुग्णलयाचे अधीक्षक डॉ. मनोज पाटील यांनी दिला आहे.

शहरातील दोन नागरिक बँकॉक तर एक फ्रांस मधून चोपड्यात परत आलेले तिघांची तपासणी करावी व योग्य ती खबरदारी घ्यावी असे पत्र महसूल प्रशासनाने कालच शहर पोलिसांना दिले होते,त्यापैकी बँकॉक वरून आलेल्या दोघांची तपासणी झाली आहे त्यांना पुढील चौदा दिवस घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे.काल रात्री तिघांच्या घरी जाऊन पोलिसांनी तपास केला असता त्यातील एक जण हा पुण्यातच असून तो चोपडा येथे आलेला नाही तर इतर दोघेही आज (शुक्रवार) रोजी सकाळी घरी पोहचले. त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ मनोज पाटील ,चोपडा शहर पोलिस निरीक्षक विनायक लोकरे ,पोलिस हेडकॉन्स्टेबल विलेश सोनवणे हे त्याच्या घरी जाऊन त्यांना पुढील तपासणीसाठी जळगाव सामान्य रुगणालयात पाठविले होते. त्या तपासणीत त्यांना करोनाची बाधा झाली नसून खबरदारी म्हणून त्यांना चौदा दिवस घरी थांबण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. तर अजून एक युवक आज अबूधाबी येथून तालुक्यात आला असून त्याला देखील पुढील तपासणीसाठी जळगाव सामान्य रुग्णालयात उद्या पाठविले जाणार आहे.