महाराष्ट्र 9

‘दामिनी’ पुरस्कार २०२० वितरण सोहळा दि.१५ रोजी

[espro-slider id=13780]

‘दामिनी’ पुरस्कार २०२० वितरण सोहळा दि.१५ रोजी


मिसेस ग्लोबल अनिता राठोडच्या हस्ते होणार; महिला दिनानिमित्ताने आयोजन


चोपडा (प्रतिनिधी): – येथील चोपडा तालुका इलेक्ट्रॉनिक्स मिडीयाने आयोजित केलेल्या ‘दामिनी पुरस्कार २०२०’ वितरण सोहळा फिल्म प्रोड्यूसर व मिसेस ग्लोबल वर्ल्ड प्रिन्सेस (साऊथ आफ्रिका) अनिता राठोड यांच्या हस्ते दि.१५ रोजी सांयकाळी ५ वाजता न.पा.नाट्यगृहात पार पडणार आहे.खान्देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना या सोहळ्यात दामिनी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी विधानसभाध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी भुषविणार असून उद्घाटन माजी आमदार कैलास पाटील करणार आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कॅाग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.संदीप पाटील, सत्रासेनचे माजी सरपंच ज्ञानेश्वर भादले,धनाजी नाना चौधरी आदि.सेवा मंडळ अध्यक्ष रवींद्र भादले,माजी चोसाका चेअरमन अॅड.घनःश्याम पाटील, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक घनःश्याम अग्रवाल,चोसाका चेअरमन अतुल ठाकरे,उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, कृउबा संचालक सुनिल जैन,न.प.गटनेता जीवन चौधरी,कृउबा सभापती नारायण पाटील, माजी पं.स.उपसभापती एम.व्ही.पाटील, माजी उपनगराध्यक्ष हितेंद्र देशमुख,सेवानिवृत्त मंडलाधिकारी अमृतराव वाघ,कॅाग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजिव बाविस्कर, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, रा.कॅा.तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील (बिटवा) ,भाजप तालुकाध्यक्ष पंकज पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
तसेच राष्ट्रवादी महिला कॅाग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा विजया पाटील, नगराध्यक्षा मनीषा चौधरी,जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, जि.प.च्या सभापती पशुसंवर्धन उज्वला म्हाळके, पं.स.सभापती कल्पना पाटील, माजी जि.प.सदस्या इंदिराताई पाटील, जि.प.सदस्या डॅा.निलम पाटील, कॅाग्रेसच्या तालुका महिलाध्यक्षा वंदना पाटील यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
असे आहेत पुरस्कारार्थी..
‘दामिनी पुरस्कार २०२०’ च्या मानकरी पुढील प्रमाणे,जीवन गौरव पुरस्कार रमलीबाई रायसिंग भादले,राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या आशाबाई गजरे,जि.प.सभापती ज्योती पाटील, जि.प.सभापती उज्वला म्हाळके, पं.स.सभापती कल्पना पाटील, आश्विनी देशमुख ( जळगाव),अंजली बोरसे (मुंबई) ,डॅा.मनिषा महाजन(किनगाव),नुतन पाटील (नाशिक),योगिता पाचपांडे (जळगाव),रोशनी पवार,रुपाली नेवे,नगरसेविका विमलबाई साळुंके,तापी सूतगिरणी संचालिका रंजना नेवे (चोपडा),ज्योती पाटील (भोरटेक),शकिला तडवी ( जळगाव),रेणुका महाजन ( पाचोरा),शुभांगी पाटील (हिंगोणा),अंजुमबी पिंजारी (लासूर),करुणा चौधरी(धानोरा),रेणाबाई बारेला ( कर्जाणे),शितल महाजन (लासूर).
संस्कृत लघुचित्रपट ‘अंबाली’ चे प्रदर्शन
खान्देशातील कलावंत बाबुलाल पाटील निर्मित व दिग्दर्शित संस्कृत भाषेतील पहिला लघुचित्रपट ‘अंबाली’ चे प्रथम प्रदर्शन या कार्यक्रमात मान्यवरांचे उपस्थित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील इलेक्ट्रॉनिक मिडीयातील प्रतिनिधी आत्माराम पाटील, संदीप पाटील, देवीलाल बाविस्कर, भगवान न्हायदे, राकेश पाटील, अनिल पालिवाल,अनिल पाटील, परेश पालिवाल अनील एन पाटील आदिंनी केले आहे.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]