महाराष्ट्र 9

चोपड्याच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रात अलविदा डायबिटीज कार्यक्रम संपन्न, डॉ.मल्हार देशपांडे व डॉ उज्ज्वल कापडनीस यांचे मार्गदर्शन

[espro-slider id=13780]

चोपड्याच्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्रात अलविदा डायबिटीज
कार्यक्रम : डॉ.मल्हार देशपांडे व डॉ उज्ज्वल कापडनीस यांचे मार्गदर्शन

चोपडा ( प्रतिनिधी )—–
येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात दोन दिवशीय आयोजित अलविदा डायबिटीज शिबिरात डॉ.मल्हार देशपांडे व डॉ उज्ज्वल कापडनीस यांनी डायबिटीज आजार होण्याची कारण,निवारण व संपूर्ण नियंत्रण बाबत मार्गदर्शन करण्यात आले.त्यात नियमित व्यायाम,आहार व मेडिटेशनचे महत्व स्पष्ट करण्यात आले.शिबिराचे उदघाटन विधान सभेचे माज़ी अध्यक्ष प्रा.अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. कैलास पाटील,चोसाकाचे माज़ी चेअरमन अड. घनशाम पाटील, डॉ.राहुल पाटील ,डॉ.तृप्ती पाटील,डॉ प्रेमचंद महाजन,डॉ.दीपक पाटील, डॉ.लोकेंद्र महाजन,विश्वनाथ अग्रवाल, नीता अग्रवाल,गौतम छाजेड़,राजू शर्मा,संध्या शर्मा , संजय शर्मा,नीताबेन शर्मा , जगदीश चौधरी , यशवंत चौधरी यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.ब्रम्हकुमारीज मेडिकल विंग द्वारा

दि.२९ फेब्रुवारी व १ मार्च रोजी आयोजित राजयोगी जीवन शैलीद्वारे निरोगी जीवन उपक्रमा अंतर्गत अलविदा डायबिटीज दोन दिवशीय शिबिराचा कार्यक्रम चोपड्यातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयात नुकताच पार पडला.

अलविदा डायबिटीज शिबिरात तालुक्यातून १५०० मधुमेह झालेल्या रुग्णांनी रजिस्ट्रेशन केले होते. शिबिरात आलेल्यांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत थांबून शिबिराचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वितेसाठी चोपडा येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय केंद्राच्या संचालिका ब्राम्हकुमारी मंगला दीदी व ब्राम्हकुमारी राज दीदी यांचेसह ओमशांती परिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Comment

[espro-slider id=13780]

Read More

[adsforwp id="60"]