सोनार समाजाचे चोपडा येथे निवेदन सादर –

नाशिक येथील सुवर्ण व्यापारी विजय बुधूशेठ बिरारी (सोनार) यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूची निष्पक्ष चौकशी करून हैद्राबाद पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणे व इं. पि. कोड ४११ कायदा महाराष्ट्रात जमीनपात्र करावा या बाबतचे निवेदन मा.तहसीलदार साहेब व चोपडा शहर पो.निरीक्षक यांना अहिर सुवर्णकार समाज चोपडा व सुवर्णकार सराफ व्यावसायिक,तसेच अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष रमेश विसपुते,माजी पी. आय. दीनानाथ सोनार, अनिल वानखेडे, महेंद्र सोनार,नितीन अहिरराव,श्याम सोनार,स्नेहल पोतदार,हेमंत जैन, जितेन जैन,चंद्रकांत अहिरराव,विलास सोनार सर,रोहित सोनार,श्रीराम सोनार,डॉ विजय जाधव,जयवंत बागुल,अतुल सोनार,बबलू विसपुते, श्याम आबा सोनार,रवींद्र वानखेडे,दीपक सोनार,भटु भाऊ सोनार,जितेंद्र भामरे,राजेंद्र विसपुते, सर्व वरील संस्थेचे पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थीत देण्यात आले.

निवेदनात पुढील बाबींचा समावेश करण्यात आला- दि. २५.०२.२०२०, मंगळवार रोजी नाशिक येथील प्रसिद्ध सराफ विजय बुधूशेठ बिरारी यांना हैद्राबाद पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व त्यात त्यांचा झालेला संशयास्पद मृत्यू या प्रकरणी दोषी हैद्राबाद पोलिसांना अटक करून सत्य बाहेर आणणे व हैद्राबाद पोलिसांवर व त्यांच्या सोबत असलेल्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा व त्यांच्या दुकानातून घेऊन गेलेली रोकड व दागिने त्यांच्या परिवारास परत करावे व या प्रकरणाची सी.आय.डी मार्फत चौकशी करावी. अशा प्रकारच्या घटना म्हणजे इं.पि.कोड ४११ अजामीनपात्र असल्याचा भ्रष्ट पोलिस अधिकारी गैरवापर करणे होय. म्हणून इं.पि.कोड ४११ महाराष्ट्रात जामीनपात्र करावा. ही सोनार समाज व सराफ व्यावसायिकांची जुनी मागणी असून तशी तात्काळ कार्यवाही व्हावी. ही मागणी सुद्धा या निवेदनाद्वारे करण्यात आली
…अन्यथा महाराष्ट्रातील सुवर्णकार बांधव व सराफ व्यवसायिक, सुवर्णकार शाखा, संस्था, मंडळ तीव्र आंदोलन करतील असे सर्वानुमते ठरले.
सर्व सराफ व सुवर्णकार बांधवांनी कै. श्री. विजय बुधूशेठ बिरारी (सोनार) यांचे संशयास्पद झालेल्या मुत्यूचा व या सम्पुर्ण घटनेचा तीव्र निषेध व्यक्क्त केला.