मराठी भाषेला अजूनही दिल्ली दरबारात पाहिजे ते वजन नाही-कवी रमेश पाटील यांनी व्यक्त केली खंत
प्रतिनिधी | चोपडा
ज्या शाळा मराठी भाषा शिकवणार नाही त्यांना एक लाखाचा दंड सरकार ठोठवणार आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा निर्णय म्हणजे आज कुसुमाग्रज याना खरी आदराजंली आहे,असे असले तरी मात्र दिल्ली दरबारात आजही मराठी भाषा मागे पडल्याची खंत जेष्ठ पत्रकार तथा कवी रमेश जे पाटील यांनी प्रमुख वक्ते प्रताप विद्या मंदिर शाळेत बोलताना सांगितले.

आज मराठी भाषा दिनानिमित्त चोपडा येथील प्रताप विद्या मंदिर शाळेत आडगाव ता चोपडा येथील कवी रमेश जे पाटील यांचा आज दुपारी साडे चार वाजता विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक,संस्थेचे समनव्यक गोविंद गुजराथी,दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्थ प्रवीण पाटील,डी टी महाजन,
उपमुख्यध्यापक डी के महाजन,डी एड कॉलेज च्या प्राचार्य योगिता पाटील,
पर्यवेक्षक आर आर शिंदे,वाय एस चौधरी,पी डी पाटील,मराठी विषय प्रमुख एम एफ माळी, किर्तीबाला पाटील,ए एस बाविस्कर,माधुरी पाटील,तुषार लोहार,
कल्पना सपकाळे,पंकज नागपुरे,एन वाय मलिक,पंकज शिंदे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कवी तथा जेष्ठ पत्रकार रमेश जे पाटील व मान्यवरांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज याच्या प्रतिमेला तसेच जेष्ठ स्वातंत्र सेनानी मगनभाऊ गुजराथी याच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले होते.
यावेळी कवी रमेश जे पाटील यांनी सांगितले की,
कवितेला प्रतिभावंत करण्यासाठी व
मराठी भाषेला अजून जास्त समृद्ध करण्याकरीता आपण आपल्या घरापासून सुरुवात करून मराठी भाषेचा वापर केला पाहिजे. मराठी जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रतिभा करण्याची आवश्यकता आहे.
**२०१६ पासून मी कविता लिहण्यास सुरूवात केली असून ४० वर्षाच्या पत्रकारितेच्या माध्यमातुन तीन काव्यसंग्रह प्रकाशित केले आहे.माझ्या जीवनात मोठं मोठ्या लोकांशी भेटण्याची संधी मिळाली.त्यात स्वतः कुसुमाग्रजाच्या समावेश राहिला हे माझे भाग्य समजतो.
**सातपुड्याच्या कुशीत जन्मलो आणि शेतकऱ्यांच्या पोटी जन्मलो म्हणून शेती,ऊन,वारा आणि माती यांचा संगम ठेऊन तीन काव्यसंग्रहाची प्रकाशित करू शकलो असेही यावेळी रमेश जे पाटील यांनी सांगितले.
प्रताप विद्या मंदिर शाळेच्या मुलांनी यावेळी मराठी भाषा दिनानिमित्त कविता सादर केल्या होत्या.तसेच डी एड कॉलेज च्या प्राचार्य योगिता पाटील यांनी देखील कविता व गजल सादर केली होती.

मुख्याध्यापक डी व्ही याज्ञीक,संस्थेचे समनव्यक गोविंद गुजराथी,डी टी महाजन,उपमुख्यध्यापक डी के महाजन,डी एड कॉलेज च्या प्राचार्य योगिता पाटील आदी